सोलापूर // प्रतिनिधी
कोरोना या महामारीने राज्यात धुमाकूळ घातला असून राज्यातील पत्रकारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हूणन आपले कुटुंब बाजूला ठेवून व जीव धोक्यात घालून गल्लोगल्लीत फिरून बातम्या केलेल्या आहेत याचे राज्य सरकार ला कोणतेच सोयरसुतक राहिलेले दिसत पत्रकार सुरक्षा समिती वतीने 27 मार्च 2020 रोजी कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला पन्नास लाख रुपये मदत करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती त्याची मुख्यमंत्री यांनी दखल घेत कोरोना महामारी ने निधन पावलेल्या पत्रकारांचा पन्नास लाख रुपये विमा कवच मंजूर केला होता ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या दरम्यान जवळपास 90 पत्रकारांचा कोरोना रोगाने मृत्यू झाला असून 1200 पत्रकारांना कोरोना रोगाने ग्रासले आहे दुसऱ्या लाटेत हा आकडा वाढला असून आजपर्यंत 20 पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून राज्य सरकार पत्रकारांच्या मृत्यू बाबत मूग गिळून गप्प बसले असून पत्रकारांच्या बाबतीत उदासीनता दिसून येत आहे
पत्रकारांच्या मृत्यूची साधी चौकशी नाही
माथेरान मधील पत्रकार संतोष पवार व पुण्याचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू ला जबाबदार असणाऱ्या हॉस्पिटल व आरोग्य यंत्रणा वर कारवाई करायला हवी होती परंतु शासकीय निष्काळजी पणाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांची साधी चौकशी करण्याचे ओन्दर्य राज्य सरकार ने दाखवले नाही अथवा शासकीय यंत्रणाने बळी गेलेल्या पत्रकारांना एक दमडी देखील दिलेली नाही अथवा समिती मार्फत चौकशी केले नाही यावरून राज्य सरकार ला पत्रकारांची किती काळजी आहे? हे दिसून येत आहे वास्तविकपाहता पत्रकारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा होता परंतु ना चौकशी ना गुन्हा दाखल
अधिस्वीकृती पत्रकार सरकार चे जावई आहेत का?
राज्यात केवळ अधिस्वीकृती पत्रकारांना शासकीय जाहिराती व इतर सोयी सवलती राज्य सरकार देत असून मूठभर पत्रकारांना खूष करून सरकार ने शेकडो पत्रकारांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप सरकार करत आहे
याबत पत्रकार सुरक्षा समितीच्या पत्रकारांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून राज्य सरकार च्या आडमुठ्या भूमिकेचा निषेध केला जात आहे सरकार च्या अश्या वागण्याने पत्रकारांमध्ये खळबळ माजली असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे
पत्रकार प्रकाश जाधव यांच्या मृत्यू ला जबाबदार कोण?
सोलापूर चे पत्रकार प्रकाश जाधव यांचे वडील कोरोना रोगाने निधन पावले असून आई आणि भाऊ कोरोनाने पॉझिटिव्ह झाल्याने राहत्या घरी क्वारंनंटाईन अश्या बिकट परिस्थितीत आर्थिक अडचण व कोरोना बाबत रेमडीसीवर इंजेक्शन वेळेवर मिळत नसल्याने पत्रकार प्रकाश जाधव यांनी राहत्या घरी आत्महत्या केलेली असून याबाबत राज्यसरकार ने चौकशी करून संबधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून पत्रकार प्रकाश जाधव यांच्या वारसाला मदत करायला हवी होती परंतु गेंड्याचे कातडी पांघरलेल्या सरकार ला अद्याप घाम फुटलेला दिसत नाही
सरकार चे डोके ठिकाणावर आहे का?
राज्यात कोरोना महामारीने अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला तसेच अनेक पत्रकारांना कोरोना ची लागण झालेली असताना राज्य सरकार पत्रकारांच्या बाबतीत इतके उदासीन का? असा जळजळीत सवाल पत्रकार सुरक्षा समितीने उपस्थित केला असून राज्य सरकार चे डोके ठिकाण्यावर आहे काय असा प्रश्न निर्माण केला आहे
याबत राज्य सरकार ने पत्रकारांच्या बाबतीत योग्य ती भूमिका घेऊन कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांची स्वतंत्र चौकशी समिती नेमावी व निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसास तात्काळ पन्नास लाख रुपये मदत करावी

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.