सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर पूर्वभागात कुचन नगर येथील श्री . दिगंबर मुनिनाथ महाराजांचे ४६ वे पुण्यतिथी महोत्सवानिमित्त महाआरती करुन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आले.
सोलापूर पूर्व भागातील श्री दिगंबर मुनिनाथ सांस्कृतिक भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येते. परंतु यंदाच्या वर्षी कोरोना प्रादुर्भाव मुळे पुण्यतिथी न साजरा करण्याचे निर्णय भजनी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आणि गुढीपाडवा रोजी महाराजाचे पुण्यतिथी अत्यंत साध्या पध्दतीने महाआरती तिर्थ प्रसाद वाटप करुन साजरा करण्यात आले.
श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांचे व गुरुमाऊली सुशिलम्मा यांचे महाआरती श्रीनिवास कुसुरकर (महाराज) यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने भजनी गीत सादर करण्यात आले. शेवटी प्रतिकात्मक गुलालाच्या कार्यक्रमाने पुण्यतिथी महोत्सवाचे सांगता करण्यात आले.
सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), श्रीनिवास कुसुरकर (महाराज), ह.भ.प. श्रीनिवास चिलवेरी, नागनाथ कारमपुरी , दशरथ नंदाल , नरेश येलुर , श्रीनिवास गाजुल , श्रीनिवास बोगा, नागार्जुन कुसुरकर , निलाबाई चिलवेरी , पुष्पावती वड्डेपल्ली, सुनंदा कुसुरकर, कलावती कुसुरकर, यमुना पिस्का, कविता कैरमकोंडा , कौशल्या मुसकुर, अॅड . मुनिनाथ कारमपुरी , श्रीकांत कुसुरकर , प्रियंका कुसुरकर , स्नेहा कुसुरकर , शुभम कारमपुरी , अनुसुर्या कारमपुरी यांच्यासह गुरुभक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.