सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील 22 गावांसह मंगळवेढा शहरात तसेच तालूक्यात शैलाताई गोडसे यांनी घरोघरी जाऊन मतदार बंधू-भगिनींची प्रत्यक्ष भेट घेत अडचणी जाणून घेतल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी मतदार बंधू-भगिनींना एक वेळ संधी द्यावी.
असे आवाहन जनतेला करीत शैलाताई गोडसे यांनी आपले निवडणूक चिन्ह "शिट्टी" या शिट्टी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावे. असे आवाहन जनतेला करीत शैलाताई गोडसे यांनी आपला प्रचार दौरा मंगळवेढा तालुक्यातील माचणूर, ब्रह्मपुरी, बठाण उचेठाण, मुढवी, धर्मगाव, ढवळस, देगाव, मल्लेवाडी, घर्निकी, मारापुर, अकोला, गणेशवाडी, शेलेवाडी, महमदाबाद, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव आणि मंगळवेढा शहर या ग्रामीण भागांमधून सौ. शैलाताई गोडसे यांनी आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील कित्येक गावे ही विकास कामापासून दूर राहिलेली आहेत.
जीवनावश्यक असलेले पिण्याचे पाणी प्रश्न, शेतकरी,कामगारांचे प्रश्न, ऊस उत्पादकांचे ऊसदराचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न ,साखर कारखाना कामगारांचा थकीत वेतनाचे प्रश्न विधान भवनामध्ये मांडण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या न्याय हक्काचा आवाज शासन दरबारी उठवण्यासाठी जनतेने एक वेळ संधी द्यावी. संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. असे अभिवचन सौ शैलाताई गोडसे यांनी मतदार बंधू भगिनींच्या भेटीदरम्यान प्रचार सभेत जनतेला अभिवचन दिले." एक वेळ संधी द्या" असे आवाहन मतदार बंधू-भगिनींना सौ. शैलाताई गोडसे यांनी केले. या वरील गावांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे." यंदा बदल हवा "अशी चर्चा ग्रामीण भागात भागातील जनतेमध्ये सध्या सुरू आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.