भाजी मंडई व बाजार पेठेत पोलीस गस्त वाढवा. महाराष्ट्र कामगार सेनेचे पोलीस आयुक्तालयाकडे मागणी




सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना महामारी रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोरोना विरुध्द नियम व अटी जाहिर केले . त्याच बरोबर नागरिकांना जीवनाश्यक वस्तुसाटी गैरसोय होऊ नये म्हणून खरेदी , विक्रीसाठी सकाळी काही वेळ सवलत दिली आहे . परंतु त्या सवलतीच्या वेळेत नागरिकांनी कोरोनाला गंभीरतेने न घेता गर्दी करुन सर्व नियम व अटी मोडीत आहेत . यामुळे बाजारपेठामध्ये गर्दी होत आहे . त्यामुळे सवलतीच्या वेळेत पोलिस गस्त ( पेट्रोलिंग ) वाढवावी . अशा मागणीचे निवेदन मा . पोलिस आयुक्तांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार नेते विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिले . 

            सदर निवेदनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . उध्दवजी ठाकरे साहेब यांनी कोरोना प्रार्दुभावामध्ये जीवनाश्यक वस्तुंसाठी नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत जीवनाश्यक वस्तुंना मुबा दिला . त्यानंतर कोरोना संकट अधिकच वाढत असल्याने दुसऱ्या टप्प्यात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मुबा दिला . आणि त्यानंतर सध्या सुरु असलेल्या ब्रेक द चेन कडक लॉकडाऊन मध्ये सकाळी ७ ते सकळी ११ वाजेपर्यंत जीवनाश्यक वस्तुंना मुबा दिले आहे . असे असतांना बाजारपेठ मध्ये दुकानदार , भाजी विक्रेते , मांस , मच्छी , अंडी विक्रेते आणि इतर वस्तु विकणारे लोक गर्दीच्या व सामाजिक अंतराचा आणि कुठल्याही नियमांचा पालन न करता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे दिसून येते . एखाद्या सामाजिक किंवा लोक प्रतिनिधी सदर गर्दी बाबत संबंधीत दुकानदार व भाजी विक्रेता आणि लोकांना गर्दी करु नका कोरोना प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात आहे . असे सांगण्यास गेल्यास त्यानांच अरे राविचा भाषा वापरून भांडणाचे स्वरुप आणतात असे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत . 

         शांतता व सुस्ववस्था आबादित ठेऊन शासन व प्रशासन पोलीस खाते कोरोना साखळी तोडण्यासाठी अहो रात्र जटत असतांना दिसुन येते . याची जानही नागरिक व विक्रेत्यांना नाही हे अत्यंत दुर्दैव आहे . तरीही आपले कर्तव्य म्हणून आपण हे कार्य पार पाडत आहात . या सेवा कार्यात महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून विविध प्रयत्न करीत आहोत . आणि त्याठिकाणी कायद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपणांस निवेदनाद्वारे विनंती करीत आहोत . 

          तरी माननीयांनी वरील विषयांचे गांभीर्याने दखल घेऊन सोलापूर शहरातील सर्व बाजार पेठा , भाजी मंडई , रस्त्यावरील भाजी विक्रेते आणि इतर जीवनाश्यक वस्तुंच्या बाजार पेठा येते सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत पोलीस गस्त ( पेट्रोलिंग ) करण्याचे आदेश द्यावेत . नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले . 

          विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात श्रीनिवास बोगा , दशरथ नंदाल , विठ्ठल कु - हाडकर , प्रशांत जक्का ,आदि उपस्थित होते .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget