अवैध हात भट्टी,दारू व शिंदी विकणाऱ्या ब्रँचेस बंद करा. महाराष्ट्र कामगार सेनेचे मा.पोलीस आयुक्तांना निवेदन




सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणे अवैद्य हातभट्टी , दारु विक्री व विषारी शिदी विक्री करणारे छोटे - छोटे घरगुती दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत . या अवैद्य दारु आणि शिदी विकणाऱ्या ठिकाणी अपार गर्दी असते आणि त्याठिकाणी जाणारे - येणारे ग्राहक व मालक कुठल्याही प्रकारचे कोविड नियम पाळत नाहीत . मास्क तर वापरतच नाहीत . आणि हि गर्दी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत होत असते . म्हणून सदर ठिकाणाहून कोरोनाचा संसर्गाचा शक्यता नाकारता येत नाही . म्हणून शहरातील सर्व अवैद्य दारु व शिंदी दुकाने बंद करावेत अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी मा . पोलिस आयुक्त यांना दिली आहे.

           सदर निवदेनात सोलापूर शहरात दिवसें - दिवस कोरोना प्रार्दुभाव वाढतच आहे . या कोरोना प्रादुर्भावाचे साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . उध्दवजी ठाकरे साहेब यांनी *ब्रेक द चेन या अभियानाद्वारे* विविध उपक्रम राबविण्याचे प्रशासनास आदेश दिले आहेत . त्यानुसार सोलापूर शहर प्रशासन योग्य पध्दतीने *ब्रेक द चेन अभियान* विविध उपक्रमाद्वारे राबवित असलयाचे दिसून येते . परंतु सोलापूर शहरात अनेक भागांमध्ये विशेष करुन झोपडपट्टी वसाहत , गोर - गरीब रहिवाशी वसाहत , कामगार वसाहत आणि दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मोठ्या प्रामणात छोटे - छोटे हातभट्टी पुटकळ दारुचे व शिंदी विक्री विक्रीचे बॅचेस घराघरात आहेत . या बॅचेस मध्ये दारु व शिंदी पिणारे गरीब व कष्टाळु लोक ते या खोलीमध्ये बॅचमध्ये दाटी - दाटीने बसून दारु पितात . या दारु व शिंदी पिणाऱ्यांना व बँचवर दारु व शिंदी विकणाऱ्याला ना मास्क असतो , ना सोशल डिस्टंट असतो , ना कुठल्याही प्रकारचा भान असतो केवळ आपला व्यसन भागविण्यासाठी ते लोक असून दारु आणि शिंदी पितात आणि दारु दुकान व शिंदी बॅचचे मालक केवळ पैसे कमविण्यासाठी आपल्या बॅचमध्ये आलेल्या ग्राहकांना कोरोनाचे नियम पाळण्याचेही सुचना देत नाहीत . त्यामुळे छोट्याशा खोलीत झालेल्या दारुड्यांच्या गर्दीमधुन कोरोना महामारी संसर्ग पसरत आहे . यात शंकाच नाही . याबाबत संबंधीत पोलीस चौकी व पोलीस स्टेशनला बॅचेसची संपूर्ण माहिती असते एखादा सुजाण नागरीक संबंधीत पोलीस स्टेशन किंवा चौकीत या प्रकारा संबंधीत तोंडी माहिती दिल्यास आम्ही कारवाई करू असे उत्तर पोलीस साहेब लोक देतात . पण प्रत्यक्षात कुठलेही कारवाई होत नाही . म्हणून आपणास सदर निवेदन देत आहोत . 

          तरी माननीयांनी वरील विषयांचे गांभियाने दखल घेऊन सोलापूर शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील किरकोळ दारु व शिंदी विक्रीचे बॅचेस बंद करुन कोरोना साखळी तोडण्याचा शासनाच्या प्रयत्नाला हातभार लावावा . हिच कळकळीची नंम्न विनंती . असे नमुद करण्यात आले . 

         विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दशरथ नंदाल , विठ्ठल कु-हाडकर , श्रीनिवास बोगा , प्रशांत जक्का आदि उपस्थित होते .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget