सोलापूर // प्रतिनिधी
सध्या सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे त्यामुळे नजिकच्या ठिकाणी उपचारासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन आ. बबनदादा शिंदे यांच्या फंडातून व जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने माढा विधानसभा मतदारसंघात गरजेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांची प्राप्त परिस्थिती व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांच्या उपलब्धतेनुसार ऑक्सीजन बेडसह कोव्हिड सेंटर सुरू करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.
ते माढा येथे आ. बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालयात सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी बुधवारी बोलत होते.
पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की, माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात सध्या दहा ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध केली आहे लवकरच तांत्रिक व इतर सर्व बाबींची पूर्तता करून या ठिकाणी 30 ऑक्सिजन बेडची सुविधा केली जाणार आहे.इतर 20 आयसोलेशन बेडची सुविधा याठिकाणी उपलब्ध होत आहे. माढा विधानसभा मतदार संघातील आलेगाव बुद्रुक,पंढरपूर तालुक्यातील उंबरे,रोपळे व तुंगत आणि माळशिरस तालुक्यातील महाळुंग प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार बबनराव शिंदे यांच्या फंडातून लवकरच ऑक्सिजन बेडसह सेंटर सुरू होणार आहेत.माढा तालुक्यातील मानेगाव,पिंपळनेर,परिते आणि पंढरपूर व माळशिरस तालुक्यात मागणीनुसार कोव्हिड सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहोत. या ठिकाणी गोळ्या,औषधे व इतर साहित्य मागणीनुसार आमदार फंडातून व जिल्हा आरोग्य विभागाकडून पुरविले जाईल असे त्यांनी सांगितले.माढा ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड सेंटर सुरू केल्यामुळे या ठिकाणचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नंबर एक मध्ये स्थलांतरित केले आहे तसेच या ठिकाणी नियमित येणाऱ्या इतर आजारांच्या रुग्णांची तपासणीची व्यवस्था कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नगराध्यक्षा ॲड.मिनलताई साठे,माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजारनाना भांगे,माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत, गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी थोरात,वैद्यकीय अधिक्षक डॉ.सदानंद व्हनकळस,डॉ.विद्यादेवी तोडेकर,डॉ.सागर पाटील,डॉ.नितेश क्षीरसागर,विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्तात्रय अंबुरे,बाळासाहेब चव्हाण, सचिन चवरे,राजेंद्र गुंड,दिनेश गाडेकर, श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
माढा येथील ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड सेंटरचे उद्घाटन करताना जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे बाजूला नगराध्यक्षा ॲड.मिनलताई साठे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.