सोलापूर // प्रतिनिधी
१४ एप्रिल २०२१ पासून पुकारलेल्या संचार बंदी व कडक निर्भधामुळे विडी व यंत्रमाग उद्योगातील कामगारांची उपासमार होणार आहे. म्हणून इतर कामगारांना आर्थिक मदत जाहीर केल्या प्रमाणे विडी व यंत्रमाग कामगारांना आर्थिक मदत जाहीर करावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी मा.जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
मा.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सोलापूरात विडी व यंत्रमाग या उद्योगात सुमारे दीड ते दोन लाख कामगार असुन त्यांची उपजिविका या उद्योगावरच अवलंबून आहे . विशेष म्हणजे या दोन्ही उद्योगात महिला कामगारांची संख्या एकुण कामगारांच्या ७० ते ८० % टक्के पर्यंत आहे . प्रत्येक कुटुंबातील पुरुष यंत्रमाग उद्योगात तर महिला विडी व यंत्रमाग दोन्ही उद्योगात काम करतात सध्या महाराष्ट्रात सुरु असलेला कोरोना प्रादुर्भावाचे संकट टाळण्यासाठी मा मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी दि . १४ एप्रिल रात्री ८ वाजल्या पासून ३० एप्रिल २०२१ मध्यरात्री पर्यंत संचारबंदी व कडक निर्बध लागु केले आहे .
त्यामुळे पुर्ण १५ ते १६ दिवस विडी व यंत्रमाग कारखाने बंद राहणार आहेत . म्हणजेच सर्व कामगार बेकार होणार आणि उपासमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून ज्याप्रमाणे मा . मुख्यमंत्री महोदयांनी , बांधकाम कामगार , घरेलु कामगार , रिक्षावाला , फेरीवाला आणि इतर कामगारांना १००० ते १५०० रुपये आर्थिक मदत जाहिर केले . त्याच धर्तीवर विडी व यंत्रमाग उद्योगातील कामगारांनाही आर्थिक मदत जाहिर करण्याचे शिफारस आपण जिल्हाधिकारी या नात्याने करावे ही नम्र विनंती .असे नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनाचे प्रत १) मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, २) उपमुख्यमंत्री, ३) मा.कामगार मंत्री, ३) मा. कामगार राज्य मंत्री, ४) मा.पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना पाठविण्यात आले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.