सोलापूर // प्रतिनिधी
८०% समाजकारण २०% राजकारण या शिवसेनेच्या उदेशाप्रमाणे शिवसेना प्रणिती महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कुचन नगर (पद्मशाली चौक) येथील कामगार सेना कार्यालयात कोविड - १९ सेवा केंद्र भवानी पेठ शाखेचे शिवसेना विभागप्रमुख श्री.शिवशंकर ढोकळे यांच्याहस्ते व महाराष्ट्र कामगार सेना प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन करण्यात आले.
सोलापुरात कोरोना पादुर्भावाचा उद्रेक होत असून अशा परिस्थितीत कोरोना पादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना काळात मदत करण्यासाठी आणि कोरोना संबंधित विषयात अडी - अडचणी सोडविण्यासाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज दि . १८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कामगार सेना कार्यालयात कोविड - १९ सेवा केंद्र शिवसेनेचे भवानी पेठ शाखेचे विभागप्रमुख शिवा ढोकळे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्षतेस्थानी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) हे होते.
प्रारंभी छत्रपत्री शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना संबंधित अडचणी असल्यास ९८८१३०१७७७ या नंबर वर संपर्क करावे.
सदर प्रसंगी विठ्ठल कुऱ्हाडकर , दशरथ नंदाल , वैष्णवी रावणे , शोभा पोला , अनिता बटगिरी, अँड. मुनिनाथ कारमपुरी, प्रसाद जगताप, प्रशांत जक्का , नरसिंग शेरला , संजीव शेट्टी , गणेश म्हंता , मनिषा , आदि उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.