महिला बचत गटाच्या माध्यमातून मायक्रोफायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या महिलांना कर्जाची परतफेड करण्यासाठी सवलत मिळावी




आ. प्रणिती शिंदे यांची मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


सोलापूर // प्रतिनिधी 

संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारने राज्यामध्ये कडक निर्बंध लागू केले आहे. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार असून त्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर आहे. परंतू सध्याच्या लॉकडाऊनमुळे त्यांची रोजंदारी बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे.

 

सदर महिलांनी त्यांचे दैनंदिन जीवन, उपजीवीका व विविध कारणास्तव बचत गटाच्या माध्यमातून मायक्रोफायनान्सकडून कर्ज घेतले आहेत. या कर्जांची परतफेड कशी करायची व आपले दैनंदिन जीवन, उपजिवीका कशी चालवायची असा प्रश्न महिलांसमोर उभा आहे. सदर महिलांना मायक्रोफायनान्स कंपनीकडून होत असलेली सक्तीची कर्ज वसुली थांबवून कामगार महिलांना कर्जाची परतफेड करण्यासाठी सवलत मिळण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी निवेदनाव्दारे मागणी केली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget