बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शशिकला यांचे निधन




ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्री शशिकला यांचा अल्पपरिचय:-अभिनेत्री शशिकला यांचा जन्म. ४ ऑगस्ट १९३२ सोलापुर येथे झाला. शशिकला यांचे हिंदी सिनेसृष्टीत मोठे योगदान होते. विशेष म्हणजे  प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता करता त्यांनी खलनायिका म्हणून एक वेगळीच छाप पाडली. शशिकला यांचे पूर्ण नाव शशिकला जावळकर, तर अभिनेत्री शशिकला मराठी असूनही हिंदी चित्रपट सृष्टीवर त्यांनी खलनायिका म्हणून अधिराज्य गाजवले.तसेच   अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शशिकला नृत्य, गायन व अभिनय करू लागल्या. वडिलांचे दिवाळे निघाल्यामुळे हे कुटुंब सोलापूर सोडून उदरनिर्वाहासाठी मुंबईस आले. त्यावेळेस अभिनेत्री शशीकला ७ ते ८ वर्षांच्या होत्या. तेथे त्यांची  नूरजहाँसोबत गाठ पडली व शशिकला यांना नूरजहाँने परखले.त्यामुळे त्यांना ‘झीनत’या शौकत रिझवी (नूरजहाँचे पती) यांच्या चित्रपटात काम मिळाले. त्यांच्या ‘जुगनू’ व इतर ३-४ चित्रपटात ४०० रुपये महिन्याने कामे केली. नंतर शशिकला यांच्याकडे निर्माते, पी. एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती व व्ही. शांताराम यांचे लक्ष गेले. १९५३ साली शांताराम यांनी त्यांना‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटात काम दिले. वयाच्या विसाव्या वर्षी के. एल. सहगल कुटुंबातील ओमप्रकाश सहगल यांच्या बरोबर शशिकला यांचा विवाह झाला. १९५९ सालापासून त्यांनी निगेटिाव्ह रोल स्वीकारणे सुरू केले. १९५९ साली आलेल्या बिमल रॉय यांच्या ‘सुजाता’ या चित्रपटात त्यांनी नायिका नूतन यांच्या बरोबरीने काम केले व स्वतःची वेगळी इमेज बनवली. १९६२ साली ताराचंद बडजात्या यांच्या ‘आरती’ या नावाजलेल्या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना बेस्ट स्पोर्टिंग अॅक्ट्रेसचा ‘फिल्म फेअर अवार्ड’मिळाला. तसेच १९६३ साली बी. आर. चोप्राच्या ‘गुमराह’ चित्रपटातील खल भूमिकेसाठी त्यांना ‘फिल्म फेअर अवार्ड’ मिळाला. शशिकला यांची संवाद फेकण्याची लकब व साजेसा अभिनय (भृकुटी व नेत्रांनी) या गुणांमुळे त्यांच्या निगेटिव्ह भूमिकाही उच्च अभिनिेत असत. एकापेक्षा एक नावाजलेल्या व श्रेष्ठ निर्मात्यांकडे त्यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केल्या. यात    ‘नौ दो ग्यारह, ’,‘कानुन’, 'जंगली’, 'हरियाली और रास्ता', ,‘अनपढ’, ‘यह  रास्ते है प्यार के ' वक्त, ‘,‘देवर’,‘अनुपमा’,‘नीलकमल’,‘तीन बहुरानियाँ’,‘हमजोली’,‘सरगम’,‘क्रांती’,‘रॉकी’,‘बादशहा’,‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ इत्यादी समावेश आहे.  चित्रपटात देखणे रूप, नृत्यात पारंगत व उत्कृष्ट अभिनय पात्रता असल्यावर नायिकेचा रोल मिळत असला, तरी त्यांना नाईकेचा रोल मिळाला नाही. हे शल्य कायम त्यांच्या मनात होते.तसेच २००७ साली भारत सरकारने त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी ‘पद्मश्री’किताबाने गौरविले होते, तसेच २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही त्यांना प्राप्त झाला होता. तसेच राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शशिकला यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार पण मिळाला होता. गेले अनेक वर्षांपासून शशिकला ही मदर टेरेसा यांच्या इगतपुरी येथील हॉस्पिटल मध्ये रुग्णसेवेत व मनःशांतीत आयुष्य व्यतीत करीत होत्या. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपट सृष्टीवर (बाॅलिवूड ) शोककळा पसरली आहे. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.अभिनेत्री शशिकला यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget