वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. परंतु अहवाल सादर करण्यापूर्वीच सीबीआयकडून देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..
दरम्यान, सीबीआयने आज माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं आहे तर इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.