सोलापूर // प्रतिनिधी
वाढत्या प्रादुर्भावला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यभर संचारबंदी लागू केली असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर, निराधार, सर्व सामान्य लोकांचे हाल होऊ नये म्हणून मा. ना. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष कार्यसम्राट व आमदार प्राणितीताई शिंदे यांनी "मदतीचा एक घास" हा उपक्रम संपूर्ण सोलापूर शहर भर ठिकठिकाणी व्यवस्था केली आहे.
*या उपक्रमाचा एक भाग म्हणून मा. सुशिल चंदू बंदपट्टे (सीए) यांच्या वतीने वडार गल्ली, बुधवार पेठ,सोलापूर येथे नवीन मोफत भोजन केंद्र चालू करण्यात आले आहे.*
सदर केंद्राचे उद्घघाटन मा. आमदार प्राणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार प्राणितीताई शिंदे यांनी 'मदतीचा एक घास' हा उपक्रम सोलापूरसह संपूर्ण राज्यभर राबविणार आहे असे म्हटले आहे.
सदर उपक्रमा साठी काँग्रेस पक्षातील आमदार, खासदार,नगरसेवक, कार्यकर्ते या सर्वांनी मदतीचा हात पुढे केला आहे असे ताईंनी म्हटले आहे.
कोरोनाच्या कठीणप्रसंगात सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करेल याबद्दल आश्वासित केले.
सदर उपक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते मा. श्री. चेतन नरोटे, नगरसेवक श्री. विनोद भोसले (सीए), मा. बाबा करगुळे, मा. राहुल वर्धा, मा. तिरुपती परकीपंडला, संयोजक मा. सुशिल बंदपटे (सीए) मा दीपक जाधव, मा अशोक यमपुरे, मा. गोपाळ पाथरुट, मा. किसन मुद्दे, मा. पुनाजी भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.