नियतीने तुम्हाला हरवले आहे कोणावर दोष देऊ नका




2019 च्या निवडणुकीत जेंव्हा 80 वर्षाचा तरुणयोद्धा  पराभूत झाला होता, त्यावेळी तुम्ही बाप -लेकानी दंड थोपटले होते, विसरलात काय..?  आणि वरून बोलला होता आना कोण आणायचं ते..., विजयांचा इतका उन्माद.? नियती प्रत्येकाला संधी देत असते...; तुम्ही जातीवादी भावना भडकवून.. मराठा - ब्राह्मण असं समीकरण लोकांच्या डोक्यात राख भरून आजपर्यंत निवडून येतं होता..;त्या मंगळवेढा भागातील भावनिक, संवेदनशील;भोळ्या-भाभड्या जनतेला दर पंचवार्षिक ला पाणी आणण्याची खोटी आश्वासने देत होता, त्यांच्या भावनेशी खेळून विजय मिळवून इकडे दंड थोपटत होता,यावेळी मात्र प्रशांतमालकांनी न लढता महाभारतातील श्री कृष्णा सारखं सारथ्य केलं.. समाधानदादाला रणांगणात उभा करून.. तुमच्या प्रत्येक व्युव्हरचणेचा चुराडा करत यश खेचून आणले.... समाधानदादा विजयी झाले.. आणी मालकांनी दंड थोपटले.. मालकांनी दंड थोपटले याचं जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर त्याला काही इलाज नाहीये कारण तुमच्या करणीचं ते फळ आहे.. आणी 2024 च्या वालग्ना करताय, मागील 12 वर्षात एखादा मोठा उद्योग,एखादी बँक, एखादी मोठी संस्था उभी करता आली नाही तुम्हाला;की जेणे करून सत्ता गेल्यानंतर ही जनतेच्या संपर्कात आपण राहू शकू, त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकू, त्याउलट आहे तो कारखाना धूऊन खाल्ला, शेतकरी कामगार उध्वस्त केले,2024 ला तुम्ही कोणत्या तोंडाने जनतेसमोर जाणार आहात..?? परिचारक कुटुंब आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आणि समाजकारणाच्या माध्यमातून तुमच्या विरोधात कुठेही दंड थोपटून उभं राहू शकतं; पण जरा डोळे उघडे ठेवून आपल्या अंतःकरनात डोकावून पहा जरा; आहे त्या साखर कारखान्यातील शेतकरी सभासद आणि  कामगारांची देणी देता आली तर खूप मिळवलं तुम्ही..!!

असो.. राग ओकण्यापेक्षा, आणि उगाच आगस्पताळ करण्यापेक्षा,आत्मपरीक्षण करा

Tags

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget