जिल्ह्यातील आ. संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान एका वृत्तपत्रामध्ये केले. आणि गेल्या दोन दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये चर्चेचा विषय बनला असून वारकऱ्यांच्या हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी वृत्तपत्रांमध्ये जनतेला आव्हान केले व्रत-वैकल्य करू नका, देव तुमच्या कामात येणार नाही कारण देवाने सध्या दरवाजे बंद केलेले आहेत आणि वृत्तपत्रातील बातमी महाराज मंडळींनी पाहिल्यामुळे त्यांचे अंतकरण दुखावले व त्यांनी विनम्रपणे आमदार संजय गायकवाड यांना फोन केला असता संजय गायकवाड महाराज मंडळींच्या सोबत असभ्य भाषेत बोलतात, ह-भ-प श्री गजानन महाराज दहिकर यांना बोलत असताना बोलण्याची पातळी सोडून दिली मी संतांना , देवांना मानत नाही एवढेच नाही तर सन महाराज पाटील सोबत बोलत असताना कीर्तनकारांच्या चारित्र्यावर आक्षेप घेतला, अच्युत महाराज बोर्डे यांच्या सोबत बोलत असताना तुम्ही 31मे तारखेला बुलढाण्यात या मी माझे सर्व कार्यकर्ते बोलावतो तुम्ही तुमची सगळी महाराज मंडळी बोलवा आणि एकदा होऊन जाउद्या म्हणजे आमदारांना महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या सोबत का युद्ध करायचे आहे का, काही महाराज मंडळींच्या सोबत बोलत असताना आई बहिणीवर शिवीगाळ सुद्धा केली त्या महाराज मंडळींचे नावे आम्ही जाहीर करू शकत नाही पण ऑडिओ क्लिप मात्र आमच्या जवळ आहेत आमदार साहेब महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यानंतर या संत भूमीत कीर्तनकार मंडळींच्या सोबत जर या भाषेत बोलत असतील तर सर्वसामान्यांच्या सोबत वागणूक काय असावी आमदार संजय गायकवाड बोलतांना म्हणाले माझ्यावर लक्ष देणारे महाराज मंडळींचा राजकीय पक्षाशी निगडीत आहेत आमचे संबंध सर्व पक्षीय राजकीय नेत्यांच्या सोबत आहेत पण या विषयाकरिता आम्ही कोणत्याही प्रकारचे राजकीय पाठबळ घेतले नाही आणि घेणारही नाही विनाकारण वारकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा खूप मोठा आदर करतो आमचा वाद कोनत्या राजकीय पक्षासोबत नसून वैयक्तिक आमदार संजय गायकवाड यांनी आमच्या भावना दुखावल्या मुळे आहे.आपणास नम्र विनंती करीत आहोत आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या खुलास्या मध्ये बोलले मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे मी वक्तव्य माझ्या कार्यकर्त्यांच्या करिता केले कोणीही अंगावर घेण्याची गरज नाही व मला फोन करणारी महाराज मंडळी राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचा आरोपही आमदार संजय राव गायकवाड यांनी आपल्या खुलासा मध्ये केला. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संजय गायकवाड यांना समज देऊन वारकऱ्यांची जाहीर माफी मागायला सांगावी ही नम्र विनंती अन्यथा विश्व वारकरी सेनाव इतरही वारकरी संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रात सर्व वारकरी मंडळी आपापल्या हद्दीतील पोलीस स्टेशन मध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या या विषयाने तक्रार दाखल करणार आहोत तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या विषयाचे गांभीर्याने दखल घ्यावी ही नम्र विनंतीअशा पद्धतीचे लेखी निवेदन मेल द्वारे माननीय मुख्यमंत्री साहेबांना पाठवण्यात आलेले असल्याची माहिती गणेश महाराज शेटे यांनी दिली आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.