उजनी धरणावर पडत्या पावसात व चक्रिवादळात जनहीतचे धरणे आंदोलन सुरूच!



सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे 5 टीएमसी. पाण्याला बेकायदेशररित्या राज्याचे मुखमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.याबाबतचा आदेश त्वरित रद्द करावी.दि.11 पासुन उजनी धरणाचे मुख्य गेटवरती गेल्या सहा दिवसांपासून जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व प्रहारचे दत्ताभाऊ व्यवहारे व संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप यांच्या सहभागातून हे आंदोलन सुरू आहे.आता सध्याच्या परिस्थितीला चक्रीवादळ व पाऊस सुरू आहे.अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन सुरूच ठेवले आहे.आंदोलनकर्त्यांचे मत आहे की,चक्रीवादळ पाऊस सुरू आहे.आम्ही मरण पत्करू पण जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही.अशी भूमिका प्रभाकर भैया देशमुख यांनी घेतलेली आहे. यात आंदोलनकर्त्यांच्या जीवितास धोका झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे जबाबदार राहतील. प्रभाकर देशमुख पावसात भिजत-भिजत पुढे बोलताना म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांची शिवसेनेबद्दलची नाराजी वाढत चालली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाला  व दैनिकातून जाहीर केले आहे.सोलापुर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आम्ही घेणार नाही परंतु अजित पवार यांच्यावरच आमचा विश्वास पडलेला आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अधिवेशनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करणार नाही अशी भूमिका घेतली होती.परंतु दुसर्‍या दिवशीपासून कनेक्शन कट करून लाखो शेतकऱ्यांवर अन्याय केला होता. त्यामुळे आता चालू आंदोलनात वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमच्या आंदोलनस्थळी पाठवून पाच टीएमसी पाणी इंदापूर जाण्याचा शासन निर्णय रद्द केलेला आहे. असे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही,असे देशमुख यांनी बोलताना ठणकावून सांगितले.  

        दत्ताभाऊ व्यवहारे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी चौकशी न करता घेतलेला निर्णय चुकीचा आहे तो त्वरित रद्द करावा. पडत्या पावसात विठ्ठल आबा मस्के, दादा गायकवाड,किरण भांगे, अंकुश महाडिक, मंगेश वाघ, अतुल भालेराव,सिद्धार्थ भास्कर,सचिन  गायकवाड इ. सहभागी होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget