उजनी धरणावर बेमुदत धरणे आंदोलन!




आंदोलनास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.


सोलापूर // प्रतिनिधी 

गेली सात दिवस झालं जनहित शेतकरी संघटनेचे उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी दिले आहे हा निर्णय रद्द करावा यासाठी आंदोलन चालू आहे जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असे भैय्यासाहेब देशमुख म्हणाले. यावेळी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर म्हणाले की लढाई आता सर्वसामान्य शेतकरीच्या हातात गेलेले असून सर्व शेतकऱ्यांनी पक्ष पार्टी राजकारण बाजूला ठेवून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर आले पाहिजे अन्यथा हे सरकार बळाचा वापर करून व प्रशासनाचा वापर करून पाणी पळून नेईल जाईल यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपन एकजुटीने लढा उभा केला पाहिजे.


आपली शेतकरीची हक्काचे भाकरी (५टीएमसी पाणी)कोणत्याही परिस्थितीत इंदापूर जाणार नाही याची काळजी आपणच करायला पाहिजे आपल्या हक्काच्या पाण्याला कोणत्याही परिस्थितीत सांडपाणी या गोंडस ‌नावाखाली पळवले जाणार आहे.  यासाठी सर्वांनी आपण निकराने लढले पाहिजे वेळप्रसंगी आपल्याला रक्त सांडले तर मागेपुढे न पाहता शेतकर्‍यांच्या न्यायासाठी जोपर्यंत पाच टीएमसी पाणी रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवला पाहिजे. यावेळी जनहितचे भैय्यासाहेब देशमुख, बळीराजाचे माऊली जवळेकर,

प्रहारचे विठ्ठलआबा मस्के, दत्ता व्यवहारे, किसान युवा ‌क्रांतीचे प्रतापसिंह चंदनकर,रांजणी उपसरपंच नागनाथ गायकवाड, नानासाहेब मोरे, मल्हारी गवळी, अतुल भालेराव, दत्ता वसेकर, विकास देशमुख, युवराज करंडे शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget