खेडभोसे येथील ग्रामस्थांसाठी लसीकरणाची व्यवस्था करा:बंडू पवार

 


एकाच महिन्यात तब्बल 17 ग्रामस्थ दगावले                         

पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या वाढत असून अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, या ग्रामस्थांना लसीकरण करायचे आहे, मात्र जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा करकंब ग्रामीण रुग्णालयात पुरेशा लसी येत नसल्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, तरी खेडभोसे येथील ग्रामस्थांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी बंडू पवार यांनी उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांचेकडे केली आहे. 


कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नुकताच गावात 10 दिवसांचा जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता. ग्रामपंचायतीने गावात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ग्रामस्थांना, शासनाने सांगितल्या नुसार नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मागील एका महिन्यात गावातील तब्बल 17 ग्रामस्थ कोरोना मुळे दगावले आहेत. दररोज एखाद दुसरा रुग्ण दगावत आहे, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना केवळ तलाठी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी परिस्थितीशी तोंड देत आहेत.


 खेडभोसे ग्रामस्थांना इच्छा असूनही लसीकरण करता येत नाही. येथील  ग्रामस्थांना झालेला संसर्ग दुसरीकडे होऊ नये यासाठी रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे, ग्रामस्थांना गावातच लसीकरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.खेडभोसे ग्रामस्थांना या महामारीतून वाचविण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कडक भूमिका घेऊन गाव कोरोना मुक्त करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 


या निवेदनाच्या प्रती तहसीलदार सुशील बेल्हेकर, पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांना देण्यात आल्या आहेत. 


चौकट : खेडभोसे गावातील परिस्थिती एवढी बिकट झालेली असताना प्रशासन ठोस भूमिका घेत नव्हते, मात्र बंडू पवार यांनी याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधून गावासाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे, त्यास पालकमंत्र्यांनी ही अनुकूलता दाखविली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget