सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी मागणीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लेखी पत्र
सोलापूर // प्रतिनिधी
इंदापूर तालुक्याला पुणे पिंपरी चिंचवड शहरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून न देता ते पुणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याद्वारे अतिरिक्त 6.90 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असेल तर ते पुणे जवळून उचलून नजीकच्या खडकवासला कालव्यात सोडून प्रस्तावित योजनेला देण्यात यावे व सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लेखी पत्र पाठवून केली आहे
पत्रामध्ये पुणे पिंपरी-चिंचवड शहरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे उचलून खडकवासला कालव्याच्या किलोमीटर क्रमांक 161 मध्ये टाकण्याच्या कामास तत्वतः मान्यता कळवण्यात आलेली आहे मात्र वास्तविक उजनी प्रकल्पाचे जलनियोजन यापूर्वी झालेले आहे सद्यपरिस्थितीत उजनी जलाशयामध्ये कोणतेही अतिरिक्त पाणी उपलब्ध नाही तसेच भीमा खोरे हे तुटीचे खोरे आहे
सध्याची परिस्थिती पाहता पुणे महापालिकेमार्फत मुंढवा येथे बंधारा बांधून त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाते व शुद्ध झालेले पाणी खडकवासला कालव्याच्या जुना मुठा कालव्यात सोडण्यात येते व उर्वरित सांडपाणी पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे पुरंदर ,दौंड ,बारामती या तालुक्या करिता वापरण्यात येते वस्तुस्थिती या सांड पाण्याचा एकही थेंबही उजनी जलाशयात येत नाही त्यामुळे वास्तविक योजनेस उजनी जलाशयातून पाणी देणे व्यवहार्य होणार नाही
सध्या उजनी जलाशयातील पाण्याचा पूर्ण वापर झाला आहे तसेच मराठवाड्याला देखील 7.5 टीएमसी पाणी मंजूर केले आहे परत ह्या योजनेकरिता पाच टीएमसी पाणी मंजूर केले तर विशेषता सोलापूर जिल्ह्यातील योजनांवर फार मोठा परिणाम होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होईल त्यामुळे सदर योजनेस स्थानिक जनतेचा विरोध होणार आहे तरी कृपया आपण जर पुणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रक्रिया केलेल्या सांड पाण्याद्वारे अतिरिक्त 6.90 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असेल तर ते पुणे जवळून उचलून नजीकच्या खडकवासला कालव्यात सोडून प्रस्तावीत योजनेला देण्यात यावे त्यामुळे खर्चही कमी होण्यास मदत होईल व सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही असे नमूद करण्यात आले आहे . असे आशयाचे अभ्यासपूर्ण पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठवून सोलापूर वर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी केली आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.