सोलापूर // प्रतिनिधी
भीमा कारखान्याचे चेअरमन माजी खासदार श्री.धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू कै. बबनदादा महाडिक यांचे कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.भीमराव दादा महाडिक यांचे लहान बंधू श्री.शामराव महाडिक यांचे चिरंजीव होते. भीमा कारखाना कार्यस्थळी कै.बबन दादा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश आण्णा जगताप,मॅनेजिंग डायरेक्टर सूर्यकांत शिंदे, भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम चव्हाण,संचालक अनिल गवळी व त्यांचे सर्व सहकारी संचालकमंडळ, ऑफिस सुपरिटेंडेंट भाऊसाहेब जगताप व त्यांचे सहकारी तसेच भीमा कारखान्याचे कामगार प्रतिनिधी यांचेसह सर्व सहकारी कामगार उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कै.बबन दादा महाडिक हे त्यांच्या बेजोड संघटन कौशल्यामुळे भीमा परिवाराचे जणू आधारस्तंभ होते. त्यांचा बोलका आणि मनमिळावू स्वभाव, दिलखुलास व्यक्तिमत्व यामुळे त्यांचा स्नेहपरिवार दांडगा होता.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे भीमा परिवाराच्या सदस्यांना त्यांची पोकळी सदैव जाणवेल,"असे भावोद्गार प्रा. संग्राम चव्हाण सर यांनी काढले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.