कोरोना रूग्णांसाठी आनंदाची बातमी




कोरोना रुग्णांवर पंढरपुरातील सोनवणे आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये औषधे दाखल


पंढरपूर // प्रतिनिधी 

गेल्या वर्षभरापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना आजारात अत्यंत उपयोगी असे आयुर्वेदिक औषध पंढरपूर येथील कै.अण्णासाहेब सोनवणे आयुर्वेदिक क्लीनिक व पंचकर्म सेंटर यांनी तयार केलं आहे. विशेष म्हणजे या औषधामुळे अल्पावधीतच अनेक रूग्णांना फायदा झाला असल्याची माहिती डॉ.सौरभ सोनवणे यांनी दिली आहे.


सध्या अनेक जणांमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. वेळेवर बेड भेटत नाही व पेशंट गंभीर होतात त्यामुळे सुरुवातीपासूनच कोरणा ची लक्षणे दिसताच किंवा टेस्ट पॉझिटिव्ह येताच ‘सुवर्णयोग’ व ‘आयुष काढा वटी’ ही आयुर्वेदिक औषधे घेतल्यास कोरोनाच्या लक्षणांमध्ये लवकर फरक येतो व रुग्ण लवकर बरे होतात.

दरम्यान काही रूग्णांना कोरोनाची लक्षणे न दिसताच कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह येत आहे. आणि काही रूग्णांना लक्षणे आहेत पण टेस्ट निगेटीव्ह येत आहेत. अशा सर्वांनी घाबरून न जाता, वरील आयुर्वेदिक औषधे चालु ठेवावीत म्हणजे आपली पुढे होणारी अनावश्यक धावपळ वाचणार आहे.


‘सुवर्णयोग’ व ‘आयुष काढा वटी’ या प्रभावी औषधांच्या उपचारामुळे रुग्णांवर येणारा अतिरिक्त ताण खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तसेच निरोगी व्यक्तींनी या औषधांचे नियमित सेवन केल्यास त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहणार असून त्यांना कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कमी राहणार आहे. हे औषध कोरोनावरील उपचारासाठी चांगला पर्याय आहे.

ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, तोंडाची चव जाणे, सर्दी,खोकला, ताप , घश्यात खवखव,छातीत कफ होणे इ.कोरोना सदृश्य लक्षणे असतील ‘सुवर्णयोग’ हे श्वास व प्राणवह संस्थानावरती काम करणारे एक आयुर्वेदिक रसायन औषध आहे.


ह्या औषधामुळे धाप लागणे, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, खोकला व न्युमोनियासारखी लक्षणांमध्ये अत्यंत कमी कालावधीत चांगली प्रगती दिसुन येत आहे. व रूग्ण गंभीर न होता लवकर बरे होत आहेत.

सध्याच्या या कोरोना विषाणु संक्रमीत वातावरणामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे. यादृष्टीने निरोगी व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आयुष काढा वटी’ या गोळ्या तयार केल्या असून या गोळ्यांच्या नियमित सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते व विषाणु संक्रमणापासून आपले संरक्षण होते.अशी माहिती डॉ. सौरभ व डॉ.सौ.श्रृती सोनवणे यांनी दिली आहे.




Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget