कोरोना रुग्णांसाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रुग्णालयास रुपये 10,00000/- लाखांचा निधी उपलब्ध:आ.परिचारक

 



पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात कोविड-१९ या विषाणुने ग्रस्त असणाèया कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्य मध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याअनुषंगाने मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांचेकडे उपजिल्हा रूग्णालय, पंढरपूर येथे Oxygen Congentrator Machine बसविणे ५ नग अंदाजे qकमत रू.५,००,०००/- व ग्रामीण रूग्णालय, मंगळवेढा येथे ऑक्सिजन सेंट्रल लाईन बसविणेसाठी अंदाजे खर्च रक्कम रू.५,००,०००/- त्वरीत मिळणेसाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी आमदार निधीतून निधी उपलब्ध करण्यासाठी लेखीपत्र दिले.

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यांना आवश्यकते उपचार मिळणेसाठी ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे निदर्शनास येत आहे. याच अनुषंगाने उपजिल्हा रूग्णालय, पंढरपूर व ग्रामीण रूग्णालय, मंगळवेढा येथे कमीत कमी ऑक्सिजन मध्ये जास्तीत जास्त रूग्णांना योग्य व वेळेत उपचार मिळावा यासाठी उपजिल्हा रूग्णालय, पंढरपूर येथे Oxygen Congentrator Machine  बसविणे व ग्रामीण रूग्णालय, मंगळवेढा येथे ऑक्सिजन सेंट्रल लाईन बसविणेबाबत अत्यावश्यक आहे. याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांचेशी पत्रव्यवहार करून स्थानिक आमदार निधीचा वापर करण्याचे लेखीपत्राद्बारे कळविले. 

तसेच सोलापूर जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयांना गरजेनुसार ऑक्सिजन कॉन्र्सेट्रेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन रेग्युलेटर, बायपंप मशिन्स, हॉस्पिटल बेडस्, आयसीयु बेड, व्हायटल साईन मॉनिटर्स, एनआयसीयु व्हेटीलेटर्स, स्टे्रचर्स, पेशंट ट्रॉल, इमरजन्सी ट्रॉली, फार्मासिटीकल फ्रिज, व्हॅक्सीन बॉक्स व कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक औषधे व साधन सामुग्री वरील वैद्यकीय यंत्र सामुग्री व साहित्य माझ्या स्थानिक आमदार निधीतून उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

याच बरोबर पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद तसेच पंचायत समितीस्तरावर आरोग्य विभाग यंत्रणेच्या माध्यमातुन रूग्णांना त्यांच्या लक्षणांनुसार विलगीकरणात ठेवणे, गृह विलगीकरण ठेवणे अथवा दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करून घेणे अशा स्वरूपाचे कामकाज युध्द पातळीवर सुरू आहे. अशी ही माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी दिली. सोलापूर जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात माझ्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून गरजेनुसार दिला जाईल असेही आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

आज दि.०६/०५/२०२१ रोजी मंगळवेढा येथे आमदार प्रशांत परिचारक व नुतन आमदार समाधान आवताडे यांचे समवेत कोरोना विषयी आढावा बैठकीत वरील कामाचे पत्र डॉ.उदयqसह भोसले, प्रांताधिकारी, मंगळवेढा यांचेकडे दिले. यावेळी तहसिलदार स्वप्निल रावडे, डिवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, तालुका अधिकारी डॉ.नंदकुमार qशदे, गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, मंगळवेढा नगरपरिषद मुख्याधिकारी परचंडराव, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष औदुंबर वाडदेकर, भाजपा तालुका अध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, युन्नुस भाई शेख यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget