सोलापूर // प्रतिनिधी
मार्च २०२० पासून सुरू असलेला कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता पत्रकारांनी कोरोनाशी लढला व लढत आहे . या लढ्यात अनेक पत्रकारांचे मृत्यु देखील झाला आहे . परंतु त्यांना कुढल्याही प्रकारचे शासकीय मदत मिळाले नाही . ज्या प्रमाणे शासकीय कर्मचारी डॉक्टर , पोलिस व आरोग्य संबधित कर्मचाऱ्यांना कोरोना संबधी व उपचार सुरू असतांना मृत्यु झाल्यास ५० लाख रुपये अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे प्रसिध्दी माध्यमातील पत्रकारांना ही ५० लाख रुपये अनुदान देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी एका निवेदनाद्वारे मा. मुख्यमंत्री यांना केले आहे.
मा. मुख्यमंत्री यांना सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने पाठविण्यात आलेल्या निवेदनात मार्च २०२० पासून संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत पसरुन महामारीचे स्वरुप घेतलेले आहे . कोरोना महामारी संपविण्यासाठी व कोरोना साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री या नात्याने आपण प्रशासनाच्या माध्यमातुन विविध उपाय योजनेद्वारे पहिल्या टप्प्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यशस्वी कामकाज व मार्गदर्शन करुन माझे कुटुंब माझी जबाबदारी या ब्रिद वाक्याप्रमाणे जनतेलाही त्यांची जबाबदारीची जाणिव करून दिलात . या यशस्वी कामकाजात डॉक्टर , पोलिस , स्वच्छता कर्मचारी , औषध निर्माते आणि सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व कर्मचारी तसेच प्रसिध्दी माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांचाही सिंहाचा वाटा आहे . म्हणून आपल्या मार्गदर्शनाने आपण पहिला टप्पा रोखण्यात यशस्वी झालो.
मार्च २०२१ पासून कोरोना महामारीचा दुसरा टप्पा सुरू झाला . हा दुसरा टप्पाचा कोरोना प्रादुर्भाव अत्यंत भयानक व जीव घेणे ठरत आहे . यातही आपल्या कनकर नेतृत्व व मार्गदर्शनामुळे आपण १०० % वरील सर्व कोरोना योध्दांच्या घटकामुळे हाही टप्पा पार करुन आपला महाराष्ट्र वाचवू . असा आत्मविश्वास आहे . वरील सर्व कोरोना योध्दांमध्ये प्रशासकीय अधिकारी , पोलिस , डॉक्टर , स्वच्छता अभियान कर्मचारी व इतर या सर्व संबधित कोरोना योध्दांना काम करतांना किंवा कोरोना उपचार घेत असतांना मृत्यु पावल्यास ५० लाख रुपये अनुदान शासनाकडून दिला जातो . परंतु पत्रकार हा प्रमुख कोरोना योध्दा आहे . पण पत्रकारांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणेबाबत कुठलीही तरतुद केलेली नाही . हे अत्यंत गंभीर बाब आहे . आपल्याच देशातील राजस्थान सरकार अर्थ मंत्रायलाने २५ मार्च २०२१ रोजी ५० लाख रुपये जे पत्रकार कोरोना काळात काम करतांना किंवा उपचार घेतांना मृत्यु पावल्यास अनुदान देण्याचे अध्यादेश काढले आहे . तर महाराष्ट्रातील पत्रकारांना ही का नको असाही सवाल निर्माण होतो .
तरी माननीयांनी आपल्या महाराष्ट्रातील कोरोना काळात काम करतांना किंवा उपचारा दरम्यान मृत्यु पावल्यास पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये अनुदान द्यावे . ही कळकळीची नम्र विनंती. असे नमूद करण्यात आले आहे .
सदर निवेदन मा . प्रधानमंत्री , मा . केंद्रीय माहिती व नभोवाणीमंत्री , मा . महाराष्ट्र राज्य माहिती व जन संपर्क संचनालय यांनी पाठविण्यात आलेली आहे .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.