विविध ठिकाणी भरती असलेल्या 53 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह



आयसोलेशन वार्डात 14 पॉझेटिव्हसह 17 जण भरती

यवतमाळ : जिल्ह्यात विविध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेले 43 आणि इलेक्टिव्ह सर्जरी कक्षात भरती असलेले 10 असे एकूण 53 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणातील 43 रिपोर्टपैकी दिग्रस येथील 16 रिपोर्ट, पुसद येथील 16 रिपोर्ट, आर्णी येथील 3 रिपोर्ट, केळापूर येथील 2 रिपोर्ट, यवतमाळ येथील 2 रिपोर्ट तर घाटंजी, वणी, मारेगाव आणि सर्जरी वॉर्डातील प्रत्येकी 1 रिपोर्टचा समावेश आहे.

तर उपचारासाठी विविध तालुक्यातील इलेक्टिव्ह सर्जरी कक्षात भरती असलेल्या 10 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.
गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला आहे. सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 14 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 17 जण भरती आहेत. यात तीन केसेस प्रिझमटिव्ह आहे. आज (दि.28) वैद्यकीय महाविद्यालयाने 26 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या एकूण नमुन्यांची संख्या 2034 असून यापैकी 1991 रिपोर्ट प्राप्त तर 34 रिपोर्ट अप्राप्त आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 1878  रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 12 तर गृह विलगीकरणात 523 जण आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget