तसेच वृत्तपत्र वितरकांनी घरपोच पेपर पोहोचवणाऱ्या मुलांची काळजी घेणे अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
रविवारपासून महाराष्ट्रात वृत्तपत्र सुरू करणार असून, घरपोच वृत्तपत्र पोहोचवण्याची परवानगी देतो आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. पण आवश्यक काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच वृत्तपत्र वितरकांनी घरपोच पेपर पोहोचवणाऱ्या मुलांची काळजी घेणे अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
एकूण ६५ हजार रुग्ण, २८ हजाराच्या आसपास रुग्ण बरे झालेले आहेत. ३४ हजार रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत, २४ हजार रुग्णांना लक्षणेही नाहीत, साडेनऊ हजार मध्यम ते तीव्र लक्षणे आहेत, दोनशे रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे.
बाहेर फिरताना सुरक्षित अंतर राखा, ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडू नये, सरकारला-जनतेला एकमेकांच्या हातात हात घालून चालायचं असल्याचंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं आहे.
महाराष्ट्राला काही जण आपलीच मंडळी बदनाम करतात आहे . जवळपास 28 हजार रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तरीही काही जणांकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होते आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.