वृत्तसंस्था // प्रतिनिधी
सर्वत्र काेराेना विषाणूचा संसर्ग वाढताेआहे. याच्या भीतीनेअनेक मजूर, कामगार व नोकरदार आप-आपल्या गावी परतत आहेत. कागल पासून कांही अंतरावर दक्षीणेस महाराष्ट्र-कर्नाटक राज्याची सरहद्द आहे.गेल्यादीड ते दाेन महिण्यात सीमेवर असलेल्या कर्नाटक पाेलीसांच्या हडेलहप्पी धाेरणाने महाराष्ट्र जनता हतबल झाली आहे.एका बाजूला कर्नाटक पाेलीसांची कठाेर भमिका तर दुस-या बाजूला महाराष्ट्र पाेलीसांची कार्य तत्परता व माणुसकी पहयला मिळते.
विविध राज्यांच्या शासनाने ये-जा करणा-या लोकांसाठी ई-पासची सोय केली आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी किंबहूना महाराष्ट्रातून जाण्यासाठी ई पास सक्तीचा करण्यात आला आहे. हे करत असताना अनेक ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडत आहे तर काही ठिकाणी माणुसकी नाहीशी झाल्याचे चित्र पाहायला मिळते असेच काहीसे चित्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये जरी वेगळी असली तरी दोघांच्या भूमिका वेगळ्या व भिन्न स्वरूपाच्या असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकातील काही लोक पुण्या मुंबई मध्ये आहेत. ते आपल्या राज्यात परत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे नागरिक कर्नाटकच्या सीमेवर आल्यावर त्यांना प्रवेश नाकारून परत पाठवण्याचे काम कर्नाटक पोलीसांकडून केल जात आहे.याच्या बराेबर उलट बाजूला कर्नाटक राज्यातून येत असलेले, महाराष्ट्रात येणाऱ्या नागरीकांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासन कशाचीही कमतरता भासू देत नाही.
या दोन राज्यांमध्ये 'माणुसकी' कर्नाटकने हरवली व महाराष्ट्राने जपली असेही चित्र आहे.देशाच्या दक्षिण भागातील केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात जाण्यासाठी पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महावरूनच कर्नाटकातून जावे लागते. राष्ट्रीय महामार्गावर कागल जवळ दूधगंगा नदीच्या पुलाच्या थोडेसे पुढील बाजूस कर्नाटक पोलिसांचा तपासणी नाका आहे. हा नाका पार करून कर्नाटकात जाणं तितकं सोपं नाही. इतकी कडक तपासणी या ठिकाणी केली जाते .उदाहरण द्यायचंच झालं तर नदीच्या पलीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील करनूर, वंदुर ,शंकरवाडी,शेंडूर,ही गावे आहेत. या गावांना या मार्गावरून ये-जा करावी लागते. या गावातील एखाद्या घटनेसाठी कागल पोलीस ठाण्याचे अधिकारी जात असतील ,कागलचे तहसिदार जात असतील ,तर अशा अधिकाऱ्यांच्या गाडीची कसून तपासणी करण्याचे काम सुध्दा कर्नाटक पोलिसांकडून केले जात आहे. यावरून लक्षात येईल की त्यांचा बंदोबस्त कितीकडक आहे.
कर्नाटक पोलिसांनी आज अखेर 5 मृतदेह परत महाराष्ट्रात पाठवले आहेत. त्यापैकी कराड, गडहिंग्लज व कोल्हापूर येथे तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर दोन मृतदेह परत गावाकडे पाठवण्यात आले. ज्या ठिकाणाहून मृतदेहांनाही प्रवेश मिळत नाही अशा ठिकाणी जिवंत माणसांना कसा प्रवेश मिळणार?असा प्रश्न याठिकाणी उपस्थीत हाेताेय.
कर्नाटकात प्रवेशासाठी महाराष्ट्राच्या सीमेवर आलेल्या नागरिकांना प्रवेश मिळत नाही. या ठिकाणी थांबून कंटाळून दोन तीन दिवसानंतर पुन्हा माघारी पुण्या-मुंबईकडे परत फिरावे लागत आहे. हे चित्र रोजचेच झाले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक पोलीसांचा दररोज वाद सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या अठरा ते वीस वयाच्या दहा मुली तीन दिवस थांबून परत फिरल्या. नवी मुंबईतून अकरा बसेसमधून आलेले २४७ प्रवासी परत गेले.
आता महाराष्ट्रातून केरळ, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांत जाणाऱ्या नागरिकांची अडवणूक सुरू आहे. या तिन्ही राज्यात जाण्यासाठी कर्नाटकातूनच राष्ट्रीय महामार्गावरून जावे लागते. काल ठाण्याहून तेलंगणाकडे नेण्यात येणारा मृतदेह कर्नाटक पोलीसांनी अडवून परत पाठविला. मुंबईहून केरळकडे जाणाऱ्या बसला प्रवेश नाकारण्यात आला आहे. लहान मुले, महीलांचा समावेश असलेली बस कर्नाटक प्रवेश मिळण्याची वाट पाहत आहे.
सीमेवर अडकून पडलेल्या लोकांना कागल पोलिसांचा आधार आहे. या लोकांना चहापान व जेवण देण्यातून माणुसकी जपण्याचे काम महाराष्ट्र पोलिसांकडून केले जात आहे. यासाठी व्हाईट आर्मी, कणेरी मठ व बैतुलमाल कमिटीचे सहकार्य लाभत आहे. व्हाईट आर्मीने आजअखेर दोन हजार लोकांची जेवण दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या उलट कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात आज अखेर सुमारे ४० बसेसमधून हजार ते बाराशे नागरिकांना पाठविण्यात आले. रायगड, पालघर, गोंदिया, नागपूर, उस्मानाबाद, सातारा, या ठिकाणी या नागरिकांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोच करण्याचे कामही कागलच्या महसूल विभागाने व कागलच्या पोलिसांनी पार पाडत माणुसकीचे दर्शन घडवले.
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेशासाठी ताटकळत बसणाऱ्या माणसांना ' यु टर्न मारून परत जा, असा दम देणारे कर्नाटक पोलीस एकीकडे व दुसरीकडे त्याच लोकांची उपासमार होऊ नये म्हणून जेवण व चहापानाची व्यवस्था करणारे महाराष्ट्र पोलीस आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोच करण्यासाठी त्यांची साेय करणारे महसूल प्रशासनाचे व एसटी आगाराचे अधिकारी, कर्मचारी. दोन राज्यांच्या भूमिकेमध्ये, प्रशासनाच्या वागणूकीमध्ये जमीन-अस्मानचा फरक जाणवतो.
कोरोनाने माणसाला कसे जगावे हे शिकविले आहे. 'माणुसकी' कर्नाटकने हरवली मात्र महाराष्ट्राने जपली अशीच आजची स्थिती कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवर आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.