पंढरपूरात राबवनार नागपुर पॅटर्न आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांचे मत



पंढरपूर // प्रतिनिधी

कोरोना सारख्या महामारी ला रोखण्यासाठी पंढरपूर नगरपरिषद विविध उपाययोजना करीत असून यामध्ये आता नवीन नागपूर पॅटर्नचा अवलंब केला जाणार आहे. यामध्ये परगावाहून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुर्ण जगभरात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. पण आपल्या पंढरपुरामध्ये आपण आपल्या देशात विविध ठिकाणी राबवलेल्या चांगल्या पॅटर्न चा आभ्यास करुन पंढरपुरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे हिताच्या गोष्टी प्रशासनाने , नगरपरिषदेने, आरोग्य विभागाने अंमलात आणले आहे. तसाच एक आदर्श पॅटर्न म्हणजे नागपुर पॅटर्न. नागपुर मध्ये महानगरपालिकेचे कमिशनर आहेत तुकाराम मुंढे. यांनी चांगल्या प्रकारे नागपुर परिस्थिती हाताळली आहे. नागपुर मध्ये कडक नियम आहेत, १००% कारवाई करण्यात येत आहे. सुरवातीला नागरिकांचा विरोध होता, पण कोरोनाचा विचार करुन इतर गावाच्या तुलनेत नागपुरात खूप चांगली परिस्थिती आहे. आता नागरिक खुप समाधानी आहेत. प्रशासनाच्या कामकाजावर खुप खुष आहेत. दि.२७ मे रोजी नागपुर मध्ये ४२८ कोरोना केस असुन , एक्टिव केस फक्त ६४ आहेत , ३५६ नागरीक कोरोना मुक्त झाले आहेत, रिकव्हरी ८३% आहे. अजून एक प्रमुख महत्वाचे कारण आहे नागपूरमधे बाहेर गावातून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणामधे ठेवण्यात आले आहे. इंस्टिट्यूशनल क्वारंटाइन मध्ये एकुण १८०४ नागरिकांना ठेवण्यात आले व ४०४ घरगुती विलगीकरणामधे म्हणजेच होम क्वारंटाईन ठेवण्यात आले.
             आमदार प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंढरपूरात काम करत आहोत. मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर , प्रांत अधिकारी सचीन ढोले, डी.वाय.एस.पी. डॉ सागर कवडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, तशिलदार वैशाली वाघमारे, बि.डी.ओ. घोडके चांगल्या प्रकारे पंढरपूर पॅटर्न हताळत आहेत. नवनवीन योजना आखल्या जात आहे, यशस्वी केल्या जात आहे.  प्रशासन व लोकप्रतिनिधींत खुप चांगल्या प्रकारे समन्वय साधुन काम करत आहे.
           पंढरपूरामध्ये यापुढे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात येईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की पंढरपूरातील रहीवाशी नसलेल्या नागरिकांनी पुढील काही काळ पंढरपूरात येणे टाळावे. नातेवाईकांनाही पंढरपूरात येण्यास मनाई करावी. बाहेरगावातुन आलेल्या पंढरपुरातील नागरिकांना १४ दिवस इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे नजरचुकीने कोणी बाहेर गावाहुन आपल्या भागात आल्यास प्रशासनाला त्वरित कळवावे व आपल्या भागतील कोणत्याही नागरीकांना कोरोना सदृश लक्षण असतील तर त्वरित कळवावे. लक्षण असली म्हणजे कोरोना आहे असे नाही पण आपण अशा व्यक्तींची काळजी घेऊ. त्याना औषध उपचार करु. सर्व नागरिकांना चांगले सहकार्य प्रशासनाला केले आहे. असाच समनवय साधुन आपल्या पंढरपूराला मजबुत करुयात.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget