वृत्तसंस्था // प्रतिनिधी
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या (Lockdown Extension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. (Lockdown 5.0 Rules Regulation)
केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये (Lockdown 5.0 Rules Regulation) अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊन कसा वाढत गेला?
पहिला लॉकडाऊन - 25 मार्च ते 14 एप्रिल
दुसरा लॉकडाऊन - 15 एप्रिल ते 3 मे
तिसरा लॉकडाऊन - 4 मे ते 17 मे
चौथा लॉकडाऊन - 18 मे ते 31 मे
पाचवा लॉकडाऊन - 1 जून ते 30 जून
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका
पहिली बैठक - 20 मार्च
दुसरी बैठक - 2 एप्रिल
दुसरी बैठक - 11 एप्रिल
तिसरी बैठक - 27 एप्रिल
पाचवी बैठक - 11 मे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो तीन मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात *(Lockdown 5.0 Rules Regulation)* आला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.