रविंद्र नरसाळे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा *( वृक्षारोपण करून दिला सर्वांना सामाजिक संदेश)*

रविंद्र नरसाळे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा*
 ( वृक्षारोपण करून दिला सर्वांना सामाजिक संदेश)*

पंढरपूर (प्रतिनिधी)

वाढदिवसावर हजारो रुपये खर्च करून वाया घालवण्यापेक्षा सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपला माणूस सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र आबा नरसाळे यांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून समाजाला पर्यावरण पूरक असा संदेश दिला आहे.
     आपल्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम धनगर वस्तीत आयोजित करण्यात आले. यावेळी वाढदिवसानिमित्त तोंडाला मास्क लावून व सुरक्षित अंतर ठेवून वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे  सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष, बाळराजे कोळेकर संतोष चोरमले शत्रुघन कोळेकर, विकास कोळेकर, पिंटू चिंचकर, प्रेम कुमार कोळेकर, बापू कोळेकर, दादासाहेब कोळेकर, रमेश कोळेकर, समाधान कोळेकर ,बालाजी ठोंबरे ,जाधव, दयानंद लोंढे हे आदी उपस्थित होते.

यावेळी वाढदिवसानिमित्त बोलत असताना बाळराजे कोळेकर  हे म्हणाले रवींद्र नरसाळे हे समाजाचे भान राखत असे समाजाच्या हिताचे कार्यक्रम राबवतात .

असे पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संभाजी साठे व करकंब प्रतिनिधी ऋषिकेश वाघमारे यांनी कळवले आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget