महाराष्ट्रातील मागासवर्गीय शेतमजुर व सुशिक्षित बेरोजगार युवक यांना दरमहा ७हजार रूपये त्यांच्या खात्यामध्ये तीन महिने वर्ग करावेत:अर्जुन चवरे



प्रतिनिधी मोहोळ.

महाराष्ट्र राज्यातील अनेक गोरगरीबांचे 
संसार लाॅकडाऊनमुळे थांबून राहिल्याने हातावर पोट असलेल्या मागासवर्गीय शेतमजुर व सुशिक्षित युवक बेरोजगार यांना दरमहा ७हजार रूपये त्यांच्या खात्यामध्ये तीन महिने वर्ग करावेत.अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री न्याय.धनंजय मुंडे यांच्याकडे शिवबुध्द  युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे केली.
कोरोना विषाणून संसर्गजन्य पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे शासनाला महाराष्ट्रातील सर्वच जनता सहकार्य करीत आहे. कोरोनाच्या विषाणू काळात अनेक गोरगरीबांचे संसार थांबून राहिल्यामुळे हातावर पोटं असलेल्या महाराष्ट्रातील
मागासवर्गीय शेतमजुर व सुशिक्षित युवक बेरोजगार यांच्यावर उपासमारीची व उपाशी राहण्याची वेळ आली आहे. तरी महाराष्ट्र शासनाने खास बाब म्हणून महाराष्ट्रातील मागासवर्गीय शेतमजुर व सुशिक्षित युवक बेरोजगार यांना दरमहा ७हजार रूपये त्यांच्या खात्यामध्ये तीन महिने वर्ग करावेत.वजा मागणी निवेदनात शिवबुध्दचे मोहोळ तालुकाध्यक्ष अर्जुन चवरे यांनी केली आहे.
निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे ,ऊर्जामंत्री ना.डाॅ.नितिन राऊत,यांच्याकडे पाठवून मागणी केली आहे असे प्रसिद्ध पत्रामध्ये शिवबुध्दचे मोहोळ तालुकाध्यक्ष अर्जुन चवरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget