बोरगाव - फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे आज दि.28 में 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता.बोरगाव म्हसवडे वस्ती येथे महात्मा फुले यांनी प्रतिपादन केलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीला अनुसरून सत्यशोधक सोमनाथ जालिंदर म्हसवडे (मुकबधीर )आणि सत्यशोधिका गौरी सुरेश जाधव,अपंग यांचा रजिस्टर नोंदणी करून रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत सत्यशोधक विवाह पद्धतीने मोफत विवाह लावला.यावेळी वधु वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मा.किशोर म्हसवडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक,पिंपरी-चिंचवड, पुणे यांचे शुभहस्ते देण्यात आले. यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की पुर्वी दारात,मंदिरात,व रानात मांडव टाकून लग्न होत होती त्या पद्धतीला मंगल कार्यालय,लॉन्स असताना देखील पुन्हा जुने दिवस आले त्याचे प्रतीक म्हणून आजचा सत्यशोधक विवाह आपल्या घराचे अंगणात होत आहे. आर्थिक बचत करण्यासाठी आता हा आदर्श सर्वांनीच घ्यावा.
गरीब - श्रीमंत व जात- धर्म हा भेदभाव देखील या कोव्हिड मुळे कमी झाला आहे.यामुळे सर्वजण एका पातळीवर आले .कोव्हिडं 19 च्या नियमामुळे फक्त 50च सगेसोयरे विवाह प्रसंगी उपस्थित राहिले पाहिजे हे बंधन आता शासनाने पुढील काही वर्षे चालू ठेवावे. यामुळे आर्थिक उधळपट्टी कमी होईल. तसेच दुसऱ्याचे पाहून लग्नावर नाहक खर्च करून कित्येक वर्षे कर्ज बाजारी होणारी सर्वसामान्य जनता आता सुखाने जगेलं. नुकतेच सर्वांनी पाहिले की कोणताही देव व सर्व समाजाची धार्मीकस्थळे आणि त्यांची दानपेटी लोकांना उपयोगी पडली नसून सामाजिक संस्था व महापुरुषांनी सांगितलेले विचार आणि त्यांनी दिलेला विज्ञान दृष्टीकोण हेच उपयोगी पडले हे सर्वांनी पाहिले आहे. लॉकडाऊन काळात सोशल मीडिया व महापुरुषांचे ग्रंथ बहुजन व इतर समाजाने वाचल्यामुळे आता अंधश्रद्धा , कर्मकांड पासून लोक दुर होऊन आता सत्यशोधक पद्धतीने विवाह करू लागलेत ही त्याची प्रचिती असुन या पुढेही असेच विवाह मोठया प्रमाणात घडावेत म्हणजे विवाहाच्या वर नाहक आर्थिक खर्च,अन्नाची नासाडी होणार नाही मग आपोआप लोकही कर्जबाजारी होणार नाहीत असेही ढोक म्हणाले तसेच या पुढे अक्षता म्हणून विवाह प्रसंगी तांदुळ न वापरता फुले वापरावीत आणि गरीब गरजु ,दिन दुबळ्याना मदत करा असे आवाहन केले.
विवाहाच्या सुरवातीला सर्व वधु वरांनी महापुरुषांचे फोटोला हार ,राष्ट्रीय ग्रंथ भारतीय संविधान ,महात्मा फुले समग्र वाड्मय चे पूजन करून फुले अर्पण केली त्यानंतर सर्वानीच ढोक यांचे मागे महात्मा फुले रचित अखंडाचे गायन व भारतीय सविधान उद्देशिकाचे वाचन केले.
या विवाह प्रसंगी मा.दत्तात्रय म्हसवडे, माजी सरपंच बोरगाव, मा.चांगदेव म्हसवडे, माजी,जिल्हा परिषद सदस्य ,सोलापूर, मा.एकनाथ कुदळे, उपाध्यक्ष, दौंड,सावता परिषद,,मा.पोपट जाधव ,कार्याध्यक्ष दौंड,सावता परिषद, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.पांडुरंग व बापू म्हसवडे हे उपस्थित होते.
अंधश्रद्धा ,कर्मकांड या प्रथांना छेद देत म्हसवडे आणि जाधव परिवाराने सत्यशोधक पद्धतीने विवाह केला यांसाठी पहिले सोमनाथ आणि गौरी हे दिव्यांग वधु वर पुढे आले म्हणून या परिसरात या जोडप्याचे आणि कुटुंबाने दिलेल्या आदर्शाची सर्वत्र चर्चा रंगली होती.
काही नातेवाईक व मित्र मंडळी तसेच आपतेष्ठ या विवाहास हजर नव्हती त्यांनी विडिओ कॉल द्वारे हा सत्यशोधक विवाह पाहून शुभेच्छा दिल्या.यावेळी अक्षता म्हणून फुले वापरण्यात आले.
हा विवाह सोहळा यशस्वी होणे कामी पांडुरंग व गणेश गावंदरे,विराज ,सुदीप,आदित्य म्हसवडे यांनी मोलाची मदत केली

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.