शेती , जनावरे, पाणी पुरवठा योजना सुरू करण्याची गरज
पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर येथील भीमा नदी सध्या कोरडी पडली असून या नदीवर अवलंबून असलेली शेती,जनावरे तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या विविध ठिकाणी च्या योजना बंद आहेत. म्हणून भीमा नदीत पाणी सोडण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
ई मेल द्वारे शिवसेना पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख ,विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे यांनी केली आहे.
सध्या देशात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. एकीकडे शेती मालाला हमीभाव नाही.त्यातच कडक उन्हाळा वाढत आहे. त्यामुळे भीमा नदी कोरडी पडलेली आहे. शेतीला पाणी नाही,जनावरांना चारा पाणी नाही.
तसेच या नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारी भाळवणी, पळशी,सुपली, उपरी या चार गावा बरोबर इतरही पाणी पुरवठा करणारी योजना सध्या बंद पडलेली आहे.
तरी याचा विचार करून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात लवकरात लवकर पाणी सोडून शेती, जनावरे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सोडवण्यात यावा,अशी मागणी केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.