सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!



 कोरोनापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. यामध्ये सॅनिटायझर तसेच साबणाने वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो, मात्र यापैकी सॅनिटायझरचा अतिवापर धोकादायक ठरत असल्याचं समोर येत आहे.

वारंवार सॅनिटायझरचा वापर केल्याने त्वचाविकार उद्धभवू शकतात, तसेच खाज येणे, आग होणे, हात लाल पडणे असे आजार होऊ शकतात. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे गजकर्ण, त्वचा कॅन्सर तसेच पेशींवरही परिणाम होतो, असंही सांगितलं जातंय.

सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेता, त्याऐवजी शक्यतो साबणाचा वापर करावा. ज्यावेळी साबण आणि पाणी उपलब्ध होऊ शकत नसेल त्यावेळी सॅनिटायझर वापरावे. तसेच 60 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कहोल असलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा, असं डॉ. सुचिता लवंगरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काही घरांमध्ये बाजारातून आणलेला भाजीपाला सॅनिटायझर्सने धुतला जात असल्याचं दिसून येत आहे. हा प्रकार देखील धोकादायक असून त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य धोक्यात येऊ शकतं.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget