सोलापूर // प्रतिनिधी
सकाळी 7 वाजता छाया बोधळे राहणार मजरेवडी यांच्या घराच्या परिसरात सकाळी 7 वाजता एक छोटा साप दिसून आला.साप लहान असल्याकारणाने त्यांनी तो पकडला.परत काही वेळातच तसाच एक साप दिसून आला.आता मात्र छाया ह्या सावधान झाल्या.त्यांनी तोही साप पकडला आणि आणखी काही साप असू शकतात का याचा शोध घेऊ लागल्या.आणि काही तासातच एका पाठोपाठ एक असे 8 साप त्यांना सापडले.त्यामुळे त्या खूप काळजीत पडल्या व त्यांनी नॅचरल ब्लु कोब्रा संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र अनिल आलदर यांना घटनेची माहिती दिली.व्हाट्सएप द्वारे सापाचे फोटो पाठवले,आणि ते पाहून आलदर यांनी ही पिल्लं अतिशय विषारी अश्या घोणस सापाची असल्याची पुष्टी केली व छाया यांना सतर्क केले.पण आलदर हे स्वतः क्वारंटाइन असल्याने घटनेची माहिती सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना दिली.हे ऐकताच सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी हा काळ घोणस सापांचा प्रजनन काळ असून घोणस हा साप सरासरी 20 ते 25 पिल्ले देतो म्हणून त्या परिसरात अजून काही पिल्ले व मादी असण्याची शक्यता वर्तविली आणि लागलीच त्याच परिसरात राहणारे त्यांचे सहकारी अक्षय फुले यांना घटना स्थळी जाण्यास सांगितले.अक्षय फुले व शंतनू पुंडा यांनी घटनास्थळी पोहचून 2 तास सापाचा शोध घेऊन आणखी 5 पिल्लं व मादी यानां पकडले.सापडलेले सगळे सापाचे पिल्लं हे अतिशय विषारी असून छाया यांना एकाही सापाने दंश केला नाही हे खूप मोठं भाग्य असल्याचे सर्पमित्र अक्षय फुले यांनी सांगितले व अजून काही पिल्लं असण्याची शक्यता वर्तवली आणि सतर्क राहण्यास तेथील उपस्थितांना सांगितले.
सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही सर्पमित्र अक्षय फुले आणि शंतनू पुंडा यांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.