महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला पंढरपूर विभागात प्रचंड प्रतिसाद.



पंढरपूर // प्रतिनिधी

कोरोनाच्या भीषण महामारीत जगाबरोबरच महाराष्ट्र राज्य झुंजत आहे. सर्व डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा , प्रशासन जीव धोक्यात घालून दिवस रात्र सेवा देत आहेत.  अश्या परिस्थितीत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताच्या तुटवडा असल्याने महाराष्ट्रातील जनतेला व कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.
याच आव्हानाला प्रतिसाद देत मौजे खळवे, ता.माळशिरस येथे जय महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ व खळवे ग्रामस्थ यांनी  गणेश चतुर्थीचे औचित्य साधून लोकनेते स्व. दत्ता आप्पा वाघमारे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात १२५   रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग घेतला.
   शिवसेना जिल्हाप्रमुख तथा  पंचायत समिती सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी युवासेना जिल्हा युवाअधिकारी- स्वप्नील भैय्या वाघमारे, माजी सरपंच अण्णासाहेब कदम, तात्यासाहेब सावंत, युवासेना तालुका समन्वयक भगवान पाटील, दीपक पाटील, प्रहार विध्यार्थी संघटनेचे किरण भांगे, अक्षय ब्लड बँकेचे डॉ.वाघमोडे, ग्रामसेवक गीते आदि उपस्थित होते.
 या कार्यक्रमासाठी आयोजन व शिबीर यशस्वी करण्यासाठी दादासाहेब ननवरे, शिवाजी ननवरे, विठ्ठल ननवरे, हनुमंत ननवरे, दिगंबर ननवरे , ह.भ.प. संतोष ननवरे, सुधाकर ननवरे, समाधान ननवरे, विक्रम पिसे, नवनाथ चव्हाण, विजय  कवलगे, आधी ग्रामस्थ व युवक मित्र मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. शिबीरासाठी अक्षय ब्लड बँक माळशिरस शाखा यांनी नेतृत्व केले रक्तदात्यांना मास्क व पिण्याच्या पाण्याचे जार वाटप करण्यात आले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget