केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय; 14 पिकांना दीडपट हमीभाव



केंद्र सरकारने कृषी क्षेत्राला दिलासा देणारा निर्णय घेतला असून, 14 पिकांना दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १४ पिकांसाठी दीडपट एमएसपी म्हणजेच हमीभाव देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची घोषणा केली केली.

सरकारने धान, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, तेलबियांसह १४ पिकांच्या एमएसपीमध्ये उत्पादन खर्चाच्या ५० टक्के वाढ केली आहे. तसेच, कृषी कर्जफेडीला ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती देताना कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, धानाची सुधारीत एमएसपी १ हजार ८६८ रुपये प्रतिक्विंटल असेल. तर संकरीत ज्वारीची एमएसपी २ हजार ६२० रुपये, बाजरीची एमएसपी २ हजार १५० रुपये करण्यात आली आहे.

कृषी कर्जफेडीफेडीसाठी ३१ माचपर्यंत असलेली मुदत आता ३१ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. कृषी कर्जावरील बॅंकांचा व्याजदर ९ टक्के असून, केंद्र सरकारतर्फे त्यावर दोन टक्के अंशदान दिले जाते. अल्पकालिन कृषी कर्जावर २ टक्के व्याजदराची सवलत आणि वेळेवर परतफेड केल्यास व्याजदरात तीन टक्के सवलत यामुळे शेतकऱ्यांना फक्त चार टक्केच व्याजाने कर्ज मिळत आहे. आज अखेरपर्यंत केंद्राने ३६० लाख टन गव्हाची तर ९५ लाख टन धानाची खरेदी केली असल्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले.

सुधारीत एमएसपी (प्रतिक्विंटल)

धान १,८६८ रुपये, धान (ए ग्रेड) १,८८८ रुपये, ज्वारी २,६२० रुपये, ज्वारी मालदांडी २,६४० रुपये, बाजरी २,१५० रुपये, नाचणी ३,२९५ रुपये, मका १,८५० रुपये, तूर ६,००० रुपये, मूग ७,१९६ रुपये, उडीद ६,००० रुपये, भूईमुग ५,२७५ रुपये, सूर्यफूल ५,८८५ रुपये, सोयाबीन ३,८८० रुपये, तीळ ६,८५५ रुपये, खुरासणी ६,६९५ रुपये, कपाशी (मध्यम धागा) ५५१५ रुपये (प्रतिगासडी), कपाशी लांब धागा ५८२५ रुपये (प्रतिगासडी)

लघुव्यावसायिकांना दिलासा

पीएम स्वनिधी (प्राईममिनिस्टर स्ट्रिट वेन्डर आत्मनिर्भर निधी) ही सूक्ष्म कर्ज योजना शहरी आवास मंत्रालयाने सुरू कली आहे. या योजनेमुळे भाजीपाला, फळे, खेळणी, चहा, खेळणी विक्रेते सलून, लाॅन्ड्री, पादत्राणे विक्रेते, पुस्तक विक्रेते, पानविक्रेते, या लहान व्यावसायिकांप्रमाणेच फेरीवाल्यांसारख्या ५० लाखांहून अधिक लघुव्यावसायिकांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. वर्षभरात समान मासिक हप्त्यात कर्जफेडीची मुभा असेल. वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांना व्याजदरात सवलतही मिळणार आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget