ह.भ.प कुकुरमुंडेकर महाराज यांना 14 दिवस होम कॉरंनटाईन का केले नाही?




पंढरपूर // प्रतिनिधी

सध्या भारत देशात कोरोना ने थैमान घातले आहे. लॉकडाऊन नंतर अनलॉक राज्या मध्ये लागु केले आहे. अशा परिस्थितीत पंढरपूरात परगावावरून पाच ते सहा हजार लोक आले आहेत. त्याना प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्या नुसार होम कॉरंनटाईन किंवा इन्स्टीटुड कॉरंनटाईन केले आहे. त्याच पार्श्वभुमी वर ह.भ.प कुकुरमुंडेकर यांना त्याच्या मालकीचा मठ असताना का परत पाठवून दिले. अशी वागणुक का देण्यात आली. त्यांना व त्याच्या बरोबर असणार्‍या एक दोन सेवकांना त्याच्याच मठात कॉरंनटाईन करणे आवश्यक होते.महाराजांनी प्रशासन अधिकारी यांना विनंती केली की मला 14 दिवस कॉरंटाईन माझे मठात करावे, परपंरेची किर्तन,भजन हे मठातच होऊ शकते त्यामुळे मला मठातच कॉरंनटाईन  करावे पण अधिकारी यांनी त्यास परवानगी दिली नाही.
  वारी होऊ नये. यात्रा भरू नये वारकर्‍यानी गर्दी करू नये,म्हणुन उपाय करणे जरूरी आहे कारण वारी मध्ये येणार्‍या भक्त भाविकामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढु शकतो व पंढरपूर नगरीतील स्थानिक नागरिकांचा जिव धोक्यात येऊ शकतो त्या अनुशंगाने उपाय करणे जरूरीचे आहे. मात्र जे जुने पिढीजात मठपती, फडकरी, पालखीवाले, ज्याच्या मालकीचे नावे मठ आहेत. अशा ह.भ.प ना व त्याच्या सोबत असणार्‍या सेवकांचा चार महिने पंढरपूरात राहण्याचा नियम आहे. अशा नागरिकांना कॉरंनटाईन करून त्यांच्या आरोग्याची खात्री करून त्यांना पंढरपूरात राहु देण्यास काय हरकत आहे ? पंढरपूरात आज पर्यंत पाच हजार स्थानिक घर मालकांच्या नागरिकांना राहण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्या धर्ती वर प्रशासनाने वारकरी सांप्रदायतील सर्व धार्मीक रूढी परंपरा जपावयास पाहिजे होत्या परंतु,ह.भ.प.कुकुरमुंडेकर महाराज यांना परत पाठवून त्या रूढी परंपरा मोडून महाराज मंडळीचा अपमान करण्यातच आनंद आहे. पालख्यांच्या प्रस्थान कार्यक्रमास 50 वारकर्‍यांना परवानगी दिली.तसेच शासनाने सात मानाच्या पालख्याच्या पादुकांना आषाढी एकादशी दिवशी आणण्याची मुभा दिली आहे. यावरून त्याच्या धार्मीक भावनाची जपवणूक केली आहे.इथे वारकरी सांप्रदायाचा मान ठेवला गेला. त्याच धर्तीवर जुनी पिढीजात वारकरी,मठपती,फडकरी महाराज यांना व त्याच्या फक्त दोन सेवकरी यांना 4 महिने राहु देण्यास काय हरकत आहे. याचा पुर्नविचार शासनाने करणे जरूरीचे आहे. अशी मागणी ब्राम्हण सेल चे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय बाळासाहेब बडवे यांनी मागणी केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget