सुशांतचे कुटुंबीय मुंबईत पोहोचले, आज होणार अंत्यसंस्कार




वृत्तसंस्था // प्रतिनिधी

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याने काल मुंबईत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि राजकारणातही मोठा धक्का बसला आहे. तर सुशांतवर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सुशांतचा कौटुंबिक मित्र निशांत जैनने दिली आहे. इतकंच नाही तर त्याचे वडील आमदार नीरज बबलू यांच्यासह अन्य दोन सदस्य सुशांतच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला पोहोचले असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

आज मुंबईत सुशांतवर अंत्यसंस्कार होणार आहेत. यासाठी त्याचे वडील केके सिंह आणि पाटणा इथला चुलत भाऊ आणि सुपौल इथला भाजपचे आमदार नीरज कुमार बाबूल यांच्यासह अन्य दोन सदस्य सकाळीच विमानानं मुंबईला रवाना झाले. तर सुशांतच्या आईचे 2002 मध्ये निधन झाले. याशिवाय त्याच्या चार बहिणी आहेत, त्यापैकी एक मीटू सिंग राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget