रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद




 आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 1500 ते 2000 रक्ताच्या पिशव्याचे संकलन

 सोलापूर प्रतिनिधी:-  आपल्या देशात व राज्यामध्ये कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असून केंद्र व राज्यशासन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.अशा स्थितीमध्ये कोरोना बाधीत तसेच इतर रूग्णांवर उपचारा दरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत असल्याने सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माढा तालुक्याचे आमदार बबनरावजी शिंदे यांनी माढा तालुक्यामध्ये दि.01 ते 10 जून या कालावधीमध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असून 1500 ते 2000 रक्ताच्या पिशव्या संकलन करणेचा मानस आहे.रक्तदान शिबिरास प्रारंभ झालेला असून आज टेंभुर्णी गटामध्ये  रक्तदान शिबीर झाले असुन  190 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे तसेच रक्तदान करणेसाठी  उस्फुर्त प्रतिसाद आहे तसेच विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यामार्फत रक्तदान करणा-या रक्तदात्यांना एक हॅन्ड सॅनिटायझर बॉटल व मास्क वाटप करण्यात येत आहेत.


सदर प्रसंगी  प्रमोद कुटे-सरंपच,रमेश येवले-पाटील,बंकट गायकवाड,राजाभाऊ थोरात,हनुमंत चव्हाण,अशोक मिस्कीन,रामभाऊ पाटील,रामभाऊ शिंदे,वैभव कुटे,गणेश केचे,पोपट लोकरे,किरण खताळ,आबासाहेब नव ले,ब्रम्हदेव मस्के,रामकृष्ण काळे मुख्य शेतकी अधिकारी संभाजी थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी महेश भादुले, शेती अधिकारी सुनिल बंडगर,ऊस पुरवठा अधिकारी महेश चंदनकर,अॅग्रीसुपरवायझर नलवडे बी.टी  व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget