लाईट बिल प्रति महिना 300युनिट माफी घ्यावी:- शिवबुध्दच्या अनुराधा देशमुख



पंढरपूर // प्रतिनिधी 

संपूर्ण महाराष्ट्रात महाभयंकर कोरोना (कोडिव-19)ह्या साथीच्या रोगाने अक्षरशः थैमान घातले हा साथीचा रोग आटोक्यात येण्यासाठी मुंबई, पुणे,सह महाराष्ट्रातील डाॅक्टर्स,सिस्टर कंपाॅडर,लॅबोरेटरीमध्ये काम करणारे लॅबोरेटरीशीयन,तपासणीस,सेवक रूग्णालयातील असंख्य कर्मचारी अथक परिश्रम घेवून कोरोना रूग्णावर उपचार करत आहेत.यात व-याच प्रमाणात यश मिळावले आहे. बरेचसे रुग्ण ठिक झालेले पहावयास मिळत आहेत.याकामी हा रोग मोठ्याप्रमाणात पसरूनये यासाठी मा.पंतप्रधान साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब,आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब, यांनी लाॅकडाऊन घोषित केलेले आहे. ह्या लाॅकडाऊनचे पालन करण्याकामी सबंध महाराष्ट्रातील मजदूर कामगार बांधव सर्व शेतकरी बांधव शेतमजुर मध्यमवर्गीय कुटूंब छोटे व्यापारी बांधव या सर्वांनी प्रसशानास सहकार्य व काटेकोर पालन केले आहे. आपल्या क्षेत्राशी निगडीत राहून जनतेने जनजागृती केली आहे .
आपल्या घरी राहून जनतेने गेली तीन महिन्यापासून आपले कर्तव्य बजावत घरातच राहुन प्रसशानाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत.
अर्धउपाशी पोटी राहून जगत काळ काढत होते.व त्यांच्या कुटूंबाचा विचार करता यांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी  300युनिट पर महिना माफी देण्यात यावी.कारण गेल्या तीन महिन्यापासून कुटुंब प्रमुख व सर्व कुटूंब सदस्य यांचे पालन पोशन करायचे कसे हा प्रश्नांशी झुंज देत होते.त्यामुळे उत्पान्नाचे साधन काहीच नाही.म्हणून हा कोरोनाचा प्रादुर्भाव महामारी हा नैसर्गिक घात कधी संपेल यांची शाश्र्वाती आहे का नाही.यास कोण जबाबदार आहे. मग हा गुन्हा कोणाचा म्हणून आम्हास 300युनिटपर्यत प्रति महिना माफी देण्यात यावी.अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा अनुराधा बाळासाहेब देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उर्जामंत्री नितीन राऊत साहेब व जिल्हाचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे लाईट बिल प्रति महिना 300युनिटपर्यत माफी घ्या.अशी मागणी करण्यात आली आहे.असेही अनुराधा देशमुख यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget