सहा दिवसांत पेट्रोल 3. 31 रु. महागले !


वृत्तसंस्था // प्रतिनिधी

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. कोरोनामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका बसत आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरांमध्ये प्रतिलिटर 57 पैशांनी वाढ करण्यात आली तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 59 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
 दोन्ही इंधनांच्या दरांत गुरुवारी प्रत्येकी 60 पैशांची वाढ केली होती. सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सहा दिवसांत पेट्रोल 3 रुपये 31 पैशांनी महागले आहे.
 पेट्रोलच्या दरात सहाव्या दिवशी वाढमुळे मुंबईत आज पेट्रोल प्रतिलिटर 81 रुपये 53 पैसे मिळत आहे तर डिझेल प्रतिलिटर 71 रुपये 48 पैसे झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कच्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत. मात्र, भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली दिसत आहे.
इंडियन ऑयलच्या संकेतस्थळानुसार आजचे दर,

               पेट्रोल      डिजल
दिल्ली :  74.57    72.81
कोलकाता
              76.48     68.70
मुंबई  : 81.53    71.74
चेन्नई : 78.47    71.14 
 सलग सहाव्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget