धनंजय मुंडे यांच्या कुटुंबातील सदस्यांचा स्वॅब निगेटिव्ह




वृत्तसंस्था // प्रतिनिधी

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचे स्वाब घेण्यात आले . त्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला असून तो सर्व निगेटिव्ह  असल्याचे सांगण्यात आले. तर अन्य एक जण परळीतील रेशन दुकानदार पॉझिटिव आला आहे. आता बीडची रुग्णसंख्या 87 झाली आहे.

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचा स्वीय सहायक व इतर पाच जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यांनतर शुक्रवारी त्यांच्या कुटुंबासह संपर्कातील लोकांचे स्वाब घेण्यात आले. यात त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सुरक्षा रक्षक, कामगार, चालक आदींचा समावेश होता. रात्री 2 वाजता त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात सर्व निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तर परळी शहरातीलच एक रेशन दुकानदारालाही लक्षणे जाणवू लागल्याने स्वाब घेतला होता, तो पॉझिटिव्ह आला आहे. पालकमंत्री यांच्या संपर्कात हा दुकानदार नव्हता, असेही समजते. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 87कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. पैकी 64 कोरोनामुक्त तर दोघांचा मृत्यू झालेला आहे. 21 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget