वृत्तसंस्था // प्रतिनिधी
महाराष्ट्र मध्ये कोरोनाचा संसर्गजन्य रोग झपाट्याने वाढत आहे अशातच अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस बांधवांवर ताण वाढत आहे त्यामुळे शासनाला 2018 मधील वेटिंग लिस्टमधील पोलिस भरती उमेदवार यांना सेवेत रुजू करू घेणे बाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना चर्चा करून पत्रव्यवहार केला आहे अश्यातच ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोणाचे सावट वाढत आहे वाशिम जवळील तामसी येथे कोरोना चे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, कोरोना या महामारीच्या युद्धात पोलिस हे आपल्या जीवाची,परिवाराची पर्वा न करता प्रामाणिक पणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत या महामारी साठी पोलीस बांधवांना लढण्याची उमेद महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना संपर्क प्रमुख पंढरी गायकवाड यांनी पोलिस बांधवाना आर्सेनिकन 30 अल्बा या आयुष्य मंत्रालयाने मान्यताप्राप्त दिलेल्या होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप सुरू केले आहेत आतापर्यंत दोन हजार नागरिकांना आणि पोलिस बांधवाना या आर्सेनिकम अल्बा 30 होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप केले आहे,
ह्या गोळ्या मधुमेह, उच्च रक्तदाब, रुग्णासहित गरोदर स्त्रिया लहान मुलापासून ते वयोवृद्ध सर्वांनाच चालतात ह्या आर्सेनिकम गोळ्यांचा फायदा पोलिस बांधवांना जास्त होऊ शकतो कारण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पोलिस बांधव हे बंदोबस्त करण्यासाठी 24 तास आपले कर्तव्य निभावत असतात हे लक्षात घेता महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना संपर्क प्रमुख पंढरी गायकवाड यांनी सर्व पोलिस बांधवाना पोलिस परिवाराला या होमिओपॅथी आर्सेनिकम 30 अल्बा गोळ्या मोफत वाटप केल्या , त्यामुळे पोलिस बांधवाचा उत्साह वाढतो आहे ,तामसी येथे ग्रामीण चें जमादार चौधरी ,व सर्व कर्मचारी यांना ह्या आर्सेनिकम गोळ्या वाटप केल्या आहेत महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना संपूर्ण महाराष्ट्रात पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या न्याय हक्क साठी लढा देत आहे,संपर्क प्रमुख पंढरी गायकवाड यांनी पोलिसांना नेहमीच सहकार्य केले आहे त्यांमूळे पोलिस प्रशासन पंढरी गायकवाड यांचे कौतुक करत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.