वृत्तसंस्था (प्रतिनिधी)
आषाढी एकादशीचा मोठा सोहळा दोन दिवसात वर आलेला असताना पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील काळा मारुती येथे 1 कोरोना पॉझिटीव्ह केस आढळून आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे सदर व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे।
संबंध व्यक्तीच्या संपर्कातील इतर सर्व व्यक्तींचा शोध सद्यस्थितीला सुरू असून यामुळे इतके काही दिवस पंढरपूर शहर हे कोरणा मुक्त होते त्याचा परत या कोरुना पेशंट सापडल्यामुळे रेड झोन मध्ये जाते का काय अशी समस्या निर्माण झाली आहे.
करकंब येथील एकजण ठाणे येथे वाहन चालक म्हणून काम करत होता. तो राहत असलेल्या खोलीतील इतरांना कोरोनाची लागण झाल्याने, तो गावी आला. तस धक्कादायक बाब म्हणजे सदर व्यक्ती ही ठाणे ते पनवेल पर्यंत बसमधून व तेथून पुढे कंटेनरमधून मोडलिंबला आला. त्यानंतर मोडलिंब मधून दुचाकीवरून करकंब येथे गुरूवारी (दि. २५ जून रोजी) रात्री आला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून त्याने स्वत:हून करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याची विनंती केली होती.
त्यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार सरवदे यांनी शुक्रवारी सकाळी त्याचा व करकंब मधील इतर एका व्यक्तीचा स्वब घेऊन सोलापूर ला पाठवले होते. त्यानंतर त्या व्यक्तीस वाखरी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आज त्याचे अहवाल प्राप्त झाले असून करकंब व्यक्तीचा अहवाल निघेटिव्ह तर ठाणे येथून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ठाण्यावरून आलेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून महत्वाची बाब म्हणजे ही व्यक्ती जास्त व्यक्तीच्या संपर्कात आलेली नाही.
*बाहेरून येणाऱ्या व्यक्तीने क्वारंटाईन व्हावे*
ग्रामीण भागात येणाऱ्या व्यक्तीने आपले कुटुंब, नातेवाईक व गाव कोरोनाबाधित होऊ नये यासाठी गावाकडे येताच वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन व्हावे. ठाणे येथून आलेला रुग्ण थेट रूग्णालयात आल्याने त्याचा कुटुंबातील किंवा गावातील व्यक्तींचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये -डॉ. तुषार सरवदे (वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय करकंब)


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.