'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी, या हेतूने प्रेरित होऊन स्थापन झालेल्या आणि राज्यासह कर्नाटक राज्यात शाखा विस्तार असलेल्या साता-याच्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार व चेअरमनपदी डॉ. अनिल पाटील यांची आज फेरनिवड झाली. संस्थेचे सचिव म्हणून वाशी, नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल सुबराव शिवणकर यांची निवड झाली.

लॉकडाऊन शिथिलीकरणानंतर रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या बैठकीत नूतन पदाधिका-यांच्या निवडी झाल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विश्वजित कदम, हणमंतराव गायकवाड, रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यात उपाध्यक्ष पदी आमदार चेतन तुपे, जयश्री चौगुले, गणपतराव देशमुख, अरुण कडू आणि एन. डी. पाटील यांची निवड करण्यात आली.

 'रयत'च्या या पदाधिका-यांची आगामी तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. कर्मवीर पुण्यतिथी दिवशी म्हणजेच ९ मे रोजी या निवडी केल्या जातात. सातारा जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट असण्याचा तो काळ असल्याने यावेळी पदाधिका-यांच्या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आजच्या सभेस डॉ. अनिल पाटील यांच्यासह सर्व जनरल बॉडीचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget