सोलापूर // प्रतिनिधी
कोविड संसर्ग काळात सर्वजण एकत्रित येऊन व्यवस्थित काम करत आहेत. मात्र, यावेळी काही पोलिसांचा मृत्यू देखील झाला. राज्यशासन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतचं ज्या पोलिसांनी उत्कृष्ट सेवा केली, त्यांना शौर्य पुरस्कार देणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांची संख्याही जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर आज आरोग्य मंत्री राजेश टोपे सोलापूर जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
सोलापुरातील मृत्युदर जास्त का आहे? याची माहिती घेतली.
उपचारातून बरे होणारे रुग्ण हे जास्त असून काही रुग्ण हे रुग्णालयात आहेत.
कोमॉर्बीड असलेले 83% रुग्ण मृत्यू झाले आहेत.
17% रुग्ण हे फक्त कोरोनामुळे दगावले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील डब्लिंग रेट हा 22 आहे.
11 टक्के मृत्युदर सोलापूरचा आहे, जो राज्यात खूप जास्त आहे.
आकड्यानुसार लोकांनी माहिती लपवली किंवा सर्व्हेतून माहिती बाहेर आली नाही.
त्यामुळे सर्व्हेच्या टीमने अधिक चांगलं काम केलं पाहिजे.
आरोग्य अधिकारी चांगलं काम करत आहेत मात्र गरज असेल तर आणखी अधिकारी देऊ.
आयुक्तांनी दोन उपयुक्त सांगितले त्यांना ते ही पुरवले आहेत.
कोमॉर्बीड रुग्णांना अलगिकरण कशात ठेवलं पाहिजे. त्यांची वेगळी व्यवस्था करा. अलगिकरण कक्षाची संख्या वाढवा अशा सूचना दिल्या आहेत.
रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा चांगला निर्णय सोलापुरात घेण्यात आला आहे.
स्क्रिनिंग मोठ्या प्रमाणात घ्या अशा सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी पोर्टेबल एक्सरे मशीन घ्या. रिडिओलॉजिस्ट कमी असतील तर टेलीरेडिओलॉजी करायला सांगितलं आहे.
रुग्णसंख्या पाहता पुरेसे बेड आहेत. शासकीय रुग्णालयात आणखी बेड कसे वाढवता येतील याचं नियोजन केलं जाईल.
जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था करण्यात येऊ शकते का? याची देखील चाचपणी केली जात आहे.
कोरोनाला 100 दिवस झालेत म्हणून थांबणं योग्य नाही. अनुदान आणि साहित्याची अडचण सोलापुरात नाही. रुग्ण वाढू नये याची काळजी घेणे गरजेचे असून मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.
महात्मा फुले योजना ही देशात राबविण्यात आलेली मोठी फ्लॅगशिप योजना आहे.
लक्षणे नसलेल्या रुग्णांना काही उपचार नसतात, फक्त काळजी घेणे महत्वाचे असते.
योजनेत लूपहोल्स असू शकतात. मात्र, या लूपहोल्स दूर करण्याचे प्रयत्न करू.
वैद्यकीय सेवा देणाऱ्यांची अँटिबॉडीज आणि अँटीजन टेस्ट करून घेण्यात या अशा सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाची शक्यता वाढते त्यामुळे खासगी रुग्णालय सुरू झालीच पाहिजेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.