तब्बल 425 वर्षाची परंपरा होणार खंडीत! विदर्भातून पंढरपूरला जाणाऱ्या रुक्मिणी माऊलीच्या पालखीला परवानगी नाही





वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

गेल्या 425 वर्षापासून रुख्मिणी मातेचे माहेरघर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथून आषाढी एकादशीला पंढरपूरला पालखी जाते. महाराष्ट्रातील जुन्या परंपरांपैकी ही एक आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ 5 पालख्यांना परवानगी दिली आहे. यामध्ये रुक्मीनी पालखीचा समावेश नाही. त्यामुळे 425 वर्षाची पालखीची पंरपरा यावेळी पहिल्यांदा खंडीत होणार आहे. त्यामुळे वारकरी नाराज आहेत.

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पंढरपूर येथे मानाच्या ५ पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
    
रुख्मिणी मातेच्या माहेरहुन दरवर्षी साडीचोळी, नैवद्य चढविण्यात येतो .मात्र यावर्षी विदर्भातील पालख्यांना परवानगी नसल्याने विठ्ठल रुख्मिणी संस्थानाने नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भातील या सर्वात जुन्या पालखीला विशेष परवानगी देण्याची विठ्ठल रुख्मिणी संस्थानाने प्रशासनाने मागणी केली आहे. 26 मेला पालखीची विधीवत पूजा केली आहे. आता पालखीचे प्रस्थान होण्यासाठी वाट पाहत असल्याचे संस्थान सदस्यांनी म्हटले आहे.

परवानगी दिल्यास सोशल डिस्टसिंगच्या नियमांचं पालन करून आम्ही पालखी काढण्यात काढू असं विश्वस्तांनी सांगितल आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्हाचे पालकमंत्र्यांशी या संदर्भात बोलणी सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आषाढी एकादशीसाठी दरवर्षी विदर्भातून अनेक पालख्या पंढरपूर रवाना होतात. मात्र यावेळी एकाही पालखीला परवानगी देण्यात आली नाही.

यावेळी मानाच्या 5 पालखीमध्ये विदर्भातील एकाही पालखीचा समावेश या वेळी केला नाही. हा विदर्भावरचा अन्याय आहे. विदर्भातील पाच पालख्यांना, 25 वारकऱ्यासह प्रवासाला मंजूरी द्यावी अन्यथा आमच्या वाहनाने आम्ही पंढरपूरला जाऊ.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget