दस्त नोंदणी मधून 98 लाख रुपयांचा महसूल



सहजिल्हा मुद्रांक निबंधक गिते यांची माहिती

सोलापूर // प्रतिनिधी 

शहर आणि जिल्ह्यातील दस्त नोंदणी कार्यालये सुरळीत सुरु असून गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केला जात असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक वर्ग एक गोविंद गिते यांनी आज दिली.   जिल्ह्यात गेल्या बुधवारपासून दस्त नोंदणी झाली.  आज अखेर 99 दस्तांची नोंदणी झाली असून याद्वारे 98 लाख 30 हजार शंभर रुपयांचा महसूल जमा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूर शहरात सोलापूर उत्तर क्रमांक एक, दोन, तीन आणि सह दुय्यम निबंधक दक्षिण अशी चार कार्यालये आहेत.  या चारही कार्यालयात फिजिकल डिस्टन्स पाळून, गर्दी होणार नाही याची  दखल घेऊन दस्तांची नोंदणी होत आहे.  यासाठी सध्या स्टेप- इन संगणक प्रणाली द्वारे वेळ आरक्षित केलेल्या पक्षकारांचे दस्त नोंदणीसाठी स्वीकारले जात आहेत.  यासाठी नोंदणी विभागाने www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्टेप-इन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.  यामुळे पक्षकारांना दस्त नोंदणीसाठी वेळ आरक्षित करता येईल.  यामुळे कार्यालयात गर्दी होण्यास टाळता येईल, असे श्री. गिते यांनी सांगितले.
एकूण 99 दस्तांपैकी सोलापूर उत्तर क्रमांक एकच्या कार्यालयात 25, दोनमध्ये 42, तीनमध्ये 32 आणि दक्षिण दुय्यम सह निबंधक कार्यालयात अद्याप एकाही दस्ताची नोंद झालेली नाही, असेही श्री. गिते यांनी सांगितले.

नागरिकांनी दस्त नोंदणी करण्यासाठी वेबसाईटवर वेळ निश्चित करावी.  वेळ आरक्षित केलेल्या नागरिकांना नोंदणी करताना प्राधान्य दिले जाईल, असे श्री. गिते यांनीसांगितले.


मद्य निर्मित प्रकल्पातून

47 लाख रुपयांचा महसूल

सोलापूर जिल्हा आणि शहरात मद्य विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.  त्याचबरोबर मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यासही परवानगी देण्यात आली आहे.  ब्रिमा  सागर महाराष्ट्र डिस्टीलरी  आणि विष्णू लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह ग्रेप डिस्टीलरी  या दोन कारखाने सुरु झाले आहेत.  या प्रकल्पाकडून राज्य शासनास अनुक्रमे 26 लाख आणि 21 लाख 326 रुपयांचा महसूल मिळाला आहे.  एकूण 47 लाख 386 रुपयांचा महसूल मद्यनिर्मिती प्रकल्‍पाकडून मिळाल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रवींद्र  आवळे यांनी सांगितले

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget