भाजी मंडई स्थलांतर म्हणजे व्यापारा वाचून वांझोट गाव



वृत्तसंस्था // प्रतिनिधी

भाजी मंडई स्थलांतर कशासाठी ? आहे त्या जागी काय अडचण आहे ते ग्रामपंचायत ने गावाची तातडीची मीटिंग घेऊन सर्व गावकऱ्यांना सांगावे. भाजी मंडई म्हणजे सर्व व्यवहार,दळणवळण,पारगाव वरून लोकांची ये - जा असणार ठिकाण अर्थात गावाचं नाक....! एखाद्या माणसाची इज्जत गेली तर माणूस म्हणतो नाक गेलं 
ते नाक अकलुजच आता जाणार आहे.तरी ही गावातून कसलीही प्रतिक्रिया अथवा विरोध नाही. गावकऱ्यांनो तुमची शांतता भविष्य काळात गावाचं मंडई वाचून वांझोटपण ठरेल.कित्येक लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण करेल.पोटाची खळगी भरण्यासाठी भाजी विकनाऱ्या गरीब श्रमिकांचा तोटा ठरेल.आमची आई चुलीवर तवा ठेवते आणि दोन मिनिटात तवा गरम होई पर्यंत भाजी घेऊन घरी येते त्याच प्रमाणे सर्व गावाला मंडई जवळ आहे, ही भाजी मंडई स्थलांतर झाली तर सगळ्या गावाचे मार्केट जाईल.आणि तेथील व्यापाऱ्यांना मोठा फटका बसेल.आपली मंडई आपली शान आहे ती स्थलांतर होऊ देऊ नका, तुमची चुल तुम्ही कष्ट कराल तेव्हा पेटते कोण आणून देत नाही.म्हणून भिऊ नका विरोध करा.गावाचं नाक आता तुमच्या हातात आहे.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर मंडई पळविण्याचा डाव आहे तो आम्ही नक्की हाणून पाडू 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget