एकूण रुग्ण १२२१, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ६९४, मृत रुग्ण ११५ तर ४१२ रुग्णांवर उपचार सुरु
सोलापूर // प्रतिनिधी
आज २२५ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १९२ अहवाल निगेटिव्ह तर ३३ अहवाल पॉझिटिव्ह तर ५५ जण कोरोनामुक्त झाले असून ८ जणांचा मृत्यू झाले आहे. अद्याप १२१ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
शनिवारी मृत्यू पावलेले रेल्वे लाईन, सिद्धेश्वर नगर, नई जिंदगी, शुक्रवार पेठ, राजस्व नगर, भारतमाता नगर, मजरेवाडी, न्यू बुधवार पेठ, न्यू पाच्छा पेठ या परिसरातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.