श्री पांडुरंग सहकारीमध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लागवड


पंढरपूर // प्रतिनिधी

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आवारात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सध्या जिल्हात लागू असलेल्या लॉकडावून संचारबंदीचे सर्व नियम काटेकोर पाळून, सोशल डिस्टन्स ठेवून कारखान्याचे चेअरमन मा.श्री.सुधाकरपंत परिचारकसाहेब, संचालक श्री,बाळासाो येलमार यांच्या हस्ते वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदरचा कार्यक्रम हा इतर कारखान्यांना प्रेरणादायी असून प्रत्येक कारखान्याने याप्रमाणे वृक्ष लागवड केल्यास निसर्गाचा समतोल राखल्यास मदत होईल. अशी इच्छा कारखान्याचे चेअरमन मा.श्री.सुधाकरपंत परिचारक यांनी व्यक्त केली.

कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णीसाहेब यांनी माहिती दिली की 5 जून हा दिवस प्रत्येक वर्षी पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे, पर्यावरण विषयी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी व पोषक वातावरणाची निर्मीती व्हावी हा पर्यावरण दिनाचा मुख्य हेतू असतो. मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक असून त्यामध्ये मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे मृदावरण, जीवावरण, जलावरण,  वातावरण या सर्व घटकांचा समावेश पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखेमधून केला जात आहे. याद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी  मोठया प्रमाणात वृक्ष लागवड केली जात असून पर्यावरण विषयक एकसंघ आणि संतुलित दृष्टीकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण केला जात आहे .

श्री पांडुरंग कारखाना प्रत्येक वर्षी पर्यावरण दिन वृक्ष लागवड करून साजरा करित असून आजपर्यत सुमारे 25000 वृक्षांची लागवड केली असून यामध्ये वड, आंबा, जांबूळ, लिंब, चिंच, नारळ, पिंपळ इ. वृक्षांचा समावेश आहे. सदरचे वृक्ष अत्यंत चांगल्या प्रकारे जोपासले जात आहेत. कारखान्याने वृक्षारोपन करताना ज्या वृक्षाचा निसर्गास समतोल राखणेसाठी उपयोग होवून त्यापासून कारखान्याचाही अर्थीक फायदा होईल अशा आंबा, जांबूळ, चिंच, नारळ या इाडांचीही लागवड केल्याने त्यापासून सध्या उत्पन्नही मिळण्यास सुरूवात झाली आहे.

मागील काही वर्षीमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे पिण्याच्या पाण्याची कमतरता असतानाही अगदी कमी  पाण्यात योग्य नियोजन करुन इतक्या मोठया प्रमाणातील वृक्षांची कारखान्याने चांगली जोपासना करुन झाडे जगवली आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget